शिवसेना ठाकरे गटाचे ८ सरपंच विजयी, भाजपाचे ५ , काँग्रेस पक्षाचे ३ तर शेकापचे २ सरपंच विजयी

 
उरण : उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका या १८ डिसेंबर रोजी पार पडल्या  त्यात डोंगरी ,भेंडखळ ,रानसई ,पिरकोन ( भाजप +कॉंग्रेस ),सारडे ,करळ सावरखार आदि गावावर भाजपचा झेंडा फडकला आहे.
 
सर्व विजयी भाजप उमेदवारांचे भाजप  संपर्क कार्यालय उरण  येथे उरण तालुका  भाजप अध्यक्ष रवी भोईर ,उरण  नगरपरिषद नगराध्यक्ष सायली  म्हात्रे ,उपनगराध्यक्ष जयविन कोळी , उरण शहर भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,नगरसेवक राजेश ठाकूर , उरण तालुका सरचिटणीस कैलास भोईर ,उरण तालुका पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील ,,हितेश शाह , उरण तालुका  उपाध्यक्ष  मुकुंद  गावंड व भाजपा कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले .
 
उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी ( दि २०) स्पष्ट झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे ८ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर रान सई या आदिवासी बांधवांच्या ग्रामपंचायतीवर भाजपाने एक हाती सत्ता संपादित करुन तालुक्यातील एकूण ५ ग्रामपंचायतीवर आपल्या सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणले आहेत. काँग्रस पक्षाचे ३ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले असून शेकापक्षाचे २ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
 
   उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका या १८ डिसेंबर रोजी पार पडल्या, मात्र यामध्ये घारापुरी ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झाल्याने या जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील ग्रामपंचायतीवर या अगोदर शिवसेना ठाकरे गटानी आपला झेंडा फडकावला होता. त्यामुळे उर्वरित जसखार, भेंडखळ, नवघर,पागोटे,करळ, पुनाडे,वशेणी,सारडे,पिरकोण,धुतूम,चिर्ले,बोकडविरा, पाणजे, डोंगरी, नवीन शेवा,रानसई आणि कळंबुसरे या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका या १८ डिसेंबर रोजी पार पडल्या त्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निकाल हा उरण येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी २० डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी जाहीर केला आहे.
 
    यामध्ये रानसई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गटांमध्ये सरळ चुरशीची लढत झाली त्यामध्ये भाजपाच्या सरपंच पदाच्या उमेदवार राधा मधुकर पारधी यांना ४९२ मते मिळाली ( विजयी) असून ग्रामपंचायतीचे सहा सदस्य निवडून आणत भाजपाने एक हाती सत्ता संपादित केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी काळूराम पारधी यांना ३२९ मते मिळाली असल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.जसखार ग्रामपंचायतीच्या शिवसेना ठाकरे गट- भाजपा आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार काशिबाई हसुराम ठाकूर यांना ९२८ मते मिळाली ( विजयी) तर पक्ष विरहित युवा गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुळा ठाकूर यांना ८८४ मते मिळाली.नवीन शेवा ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सोनल निलेश घरत यांना ८८० मते मिळाली (विजयी) तर भाजपा आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार चेतना घरत यांना २८६ मते मिळाली आहेत.
 
   पाणजे ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाच्या आघाडीच्या उमेदवार लखपती हसुराम पाटील यांना ४२९ मते मिळाली (विजयी) तर शेकाप सरपंच पदाचे उमेदवार रोहन महादेव भोईर  यांना ४०० मते मिळाली आहेत.पागोटे ग्रामपंचायत मध्ये शिवसेना ठाकरे गट - शेकाप सरपंच पदाचे उमेदवार कुणाल पाटील यांना ६९५ मते मिळाली (विजयी) तर भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार जितेंद्र पाटील यांना ३७३ मते मिळाली आहेत.कळंबुसर ग्रामपंचायत मध्ये शिवसेना ठाकरे गट- शेकाप सरपंच पदाच्या उमेदवार उर्मिला निनाद नाईक यांना ९३८ मते मिळाली ( विजयी) तर भाजपा सरपंच पदाच्या उमेदवार सरिता रत्नदीप नाईक यांना ५३० मते मिळाली आहेत.नवघर ग्रामपंचायत मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सविता नितीन मढवी यांना १०२५ मते मिळाली ( विजयी) तर भाजपाच्या सरपंच पदाच्या उमेदवार शालिनी गणेश वाजेकर यांना ९७२ मिळाली आहेत.
 भेंडखळ ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजिता मिलिंद पाटील यांना ७९९ मते मिळाली (विजयी) तर काँग्रेस- शेकाप आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार योगिता योगेश ठाकूर यांना ७०१ मते मिळाली आहेत.करळ ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार अनिता अरविंद तांडेल यांना ३५५ मते मिळाली ( विजयी) तर दर्शना नितीन तांडेल यांना ३४४ मते मिळाली आहेत.डोंगरी ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या सरपंच पदाचे उमेदवार संकेत दिलीप घरत यांना ५४६ मते मिळाली (विजयी),तर शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार निलेश नरेश घरत यांना ५४२ मते मिळाली आहेत.सारडे ग्रामपंचायत मध्ये भाजपा सरपंच पदाचे उमेदवार रोशन पांडुरंग पाटील यांना ५७९ मते मिळाली (विजयी) तर शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकांत राजाराम पाटील यांना ३४४ मते मिळाली आहेत.
 
   पुनाडे ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार निलेश अनंत कातकरी यांना ४५८ मते मिळाली (विजयी) तर भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार सत्यवान कातकरी ३८६ मते मिळाली आहेत.पिरकोण काँग्रेस- भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार कलावंती काशिनाथ पाटील यांना १३९९ मते मिळाली (विजयी)तर शेकाप युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार संगिता प्रशांत म्हात्रे यांना १२९४ मते मिळाली.धुतूम ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस- शिवसेना युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांना ९४० मते मिळाली ( विजयी) तर शेकाप- भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सीमा कांती ठाकूर यांना ६०९ मते मिळाली आहेत.
 
चिर्ले ग्रामपंचायत मध्ये शेकाप सरपंच पदाचे उमेदवार सुधाकर उर्फ काका भाऊ पाटील यांना १३२१ मते मिळाली (विजयी) तर काँग्रेस - भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार विनोद राम पाटील यांना १०७१ मते मिळाली आहेत.बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये शेकाप सरपंच पदाच्या उमेदवार अर्पणा मनोज पाटील यांना ८२९ मते मिळाली ( विजयी) तर आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रोहन महादेव भोईर यांना ४०० मते मिळाली आहेत.यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.पाणजे ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दोघा उमेदवारांना सारखीच  मते मिळाल्याने लहान मुलीच्या हातून चिठ्ठी काढून उमेदवार विजयी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. मत मोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आरपीआयचे नवी मुंबई महानगरपालिकेविरोधात हल्लाबोल आंदोलन