संपूर्ण दिवाळे गावाभोवती लवकरच रिंगरोड

 नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने दिवाळे गांव-स्मार्ट व्हिलेज अंतर्गत संपूर्ण दिवाळे गावाभोवती निर्माण होणाऱ्या रिंगरोडचे भूमीपुजन २२ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. सदर रिंगरोडचे भूमीपुजन नवी मुंबई महापालिकाचे माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, उपअभियंता अजय पाटील, कनिष्ठ अभियंता रोहन जळे, स्वस्तिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे राजेश वरळीयाक तसेच माजी नगरसेविका भारती कोळी, ‘फगवाले मच्छीमार संस्था'चे अध्यक्ष अनंता बोस, ‘खांदेवाले मच्छीमार संस्था'चे अध्यक्ष रमेश हिंडे, ‘डोलकर मच्छीमार संस्था'चेअध्यक्ष पांडुरंग कोळी, ‘एकविरा मच्छीमार संस्था'च्या अध्यक्षा सुरेखा कोळी, परशुराम पाटील, रवींद्र म्हात्रे, सुरेश पोटे, चंद्रकांत कोळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

दिवाळे गांव-स्मार्ट व्हिलेज अंतर्गत सर्व सेवा, सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. स्मार्ट व्हिलेज दिवाळे गाव नवी मुंबईतील पहिले मॉडेल आपण बनवीत असून त्यामध्ये सुसज्ज जेट्टी, सर्व सुविधांयुक्त ९० गाळ्यांचे मच्छी मार्केट-भाजी मार्केट, १०० वाहनांचे कार पार्किंग,  पलेमिंगो गार्डन उभारण्यात आलेले आहे. तसेच समाजपयोगी बहुउद्देशीय इमारत, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, गजेबो गार्डन, लहान मुलांच्या करमणुकीसाठी खेळणी घर, तरुणांसाठी व्यायाम शाळा, विद्यार्थी-वाचकांसाठी सुसज्ज ग्रंथालय व कंप्युटर प्रशिक्षण केंद्र, विविध कार्यक्रमासाठी मंच अशी अनेक  कामे प्रस्तावित असून आता संपूर्ण गावाच्या भोवताली रिंगरोडच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

दिवाळे गांव नवी मुंबईतील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट व्हिलेज असून याची नोंद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. गावातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता संपूर्ण गावाच्या भोवताली रिंगरोड निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. आज त्या कामाला सुरुवात झाली आहे. आज दिवाळे गावातील ग्रामस्थांनीही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
आणि मेडीकल कॉलेज होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत अनुमोदन दिले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खेळाचे मैदान वाचवण्यासाठी ‘फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन'च्या नवी मुंबईत सह्यांची मोहीम सुरु