काही राजकीय विरोधकांचा ‘मैदान वाचवा' प्रकरणाचे भांडवल करुन केविलवाणा प्रयत्न - आ.मंदाताई म्हात्रे

मलाश्रेय मिळू नये यासाठी विरोधकांकडून ‘मैदान वाचवा' प्रकरण - आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई ः नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारण्यात यावे अशी जनतेची सातत्याने होणारी मागणी लक्षात घेता मी सदर हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माझ्या प्रयत्नांना यश येऊन राज्य शासनाने याबाबत हिरवा कंदील दाखविला. परंतु, याचे मला श्रेय मिळू नये याकरिता काही राजकीय विरोधक ‘मैदान वाचवा' प्रकरणाचे भांडवल करुन केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

मैदान वाचवा एक चांगली गोष्ट आहे, या भूमिकेच्या मी विरोधात नाही. सदर जागेवर असणारे मैदान बेलापूर, दिवाळे, आग्रोळी, किल्ले गांवठाण, शाहबाज, फणसपाडा अशा ग्रामस्थांकरिता आरक्षित करावे, अशी माझीच मागणी होती.
याबाबत महापालिका आणि सिडको प्रशासनाकडे केलेले सर्व पत्रव्यवहार माझ्याकडे आहेत. परंतु, हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेजची मागणी करुन मी काही मोठा गुन्हा केला का? असा सवाल आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरुन ज्या पध्दतीने माझ्याविरुध्द आरोप होत आहेत, ते पाहता त्यांनी चालवलेला स्टंट असल्याचे नागरिक खाजगीत बोलत आहेत.

महापालिकेने दुसरी १० एकर जागा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजकरिता  उपलब्ध करुन दिली तरी मला काही हरकत नाही. परंतु, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज होणे काळाची गरज आहे. मैदानाला माझा विरोध नाही, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना सर्व सुविधा मिळणे त्यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे. बेलापूर ग्रामस्थांसाठी खेळाचे मैदान आरक्षित करावे, अशी माझीच मागणी आहे. मैदानासाठी इतर कोणत्या
पुढाऱ्यांनी मागणी केली का? असा सवालही आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

हम वो तीर है, जो हिमालय को चीरकर अपना रास्ता मै खुद बना सकती हू कोई साथ दे या नही दे, फिर भी नवी मुंबई को मै हिला सकती हु असे म्हणत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केविलवाणा स्टंट करणाऱ्या राजकीय विरोधकांना इशारा दिला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

संपूर्ण दिवाळे गावाभोवती लवकरच रिंगरोड