दिवाळी सण मोठा, नाही भेटवस्तुंना तोटा !
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मजूरांना, मालकांनी आपल्या नपयाचा काही भाग बोनस म्हणून वाटण्याचा असो की, सरकारी, निमसरकारी वा इतर आस्थापनातील लोकांना मिळणारे सानुग्रह अनुदान असो, या निमित्ताने कर्मचाऱ्यांच्या हातात, पगाराव्यतिरिवतचा पैसा खळखळू लागला व त्यांनीही आपापल्या जवळच्या लोकांना भेटवस्तू देण्याची परंपरा चालू केली. परिणामस्वरुप आज भेटवस्तूचा बाजार उभारीला आला आहे.
भारतीय संस्कृतीत बहुतेक सण एखाद्या मंदिर, धार्मिक स्थळ, घाट वा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जमून सामुहिक रुपात साजरे केले जातात, पण सुख-समृद्धी व ऐश्वर्याची कामना करीत दिवाळी आपण आपल्या घरीच साजरी करतो. अशावेळी कामनापूर्तीसाठी घरही महत्त्वाचे असते.
घर म्हणजे त्याची रचना, त्याचे वास्तू शास्त्र, यामुळेच दिवाळीशी संबंधित खूप सारी तयारी करावी लागते. रीतीरिवाजाचे सिद्धांत पाळणे अनिवार्य ठरते. दसरा सण संपताच सर्वांना वेध लागतात ते दिवाळीचे. त्यासाठी अनेकजण, घराच्या सजावटीकडे, रंग रंगोटीकडे लक्ष द्यायला लागतात. पूर्वीच्या काळी गावांकडे घराचे सारवण-सुरवण करुन अंगणही साफसुफ केले जायचे, अंगणात शेकडो पणत्या आकर्षक स्वरुपात ठेवण्याची व्यवस्था केली जायची. मुख्य दारासमोर रांगोळ्या काढल्या जायच्या, मुख्य दारावर तोरण बांधून व आकर्षक दिव्यांची रोषणाई केली जायची. आज बहुतेक गावांचे शहरीकरण झाल्याने घराला अंगण राहिलेले नाही.घराचे मुख्य द्वार अत्यंत महत्त्वाचे असते, त्याला स्वागतद्वारही म्हटले जाते. त्यामुळेच दिवाळीच्या काळात ‘मुख्य' दारावर तोरण, रांगोळी, सजावटीसोबत दिवे लावणे. शुभ उर्जेला आमंत्रण देणारे व तिचे स्वागत करणारे असते. मुख्य दाराला कोठेही छिद्र वा भेगा नसण्याची काळजी घेतली जाते. एवढंच कशाला दार उघडतांना वा बंद करताना आवाज येणार नाही याकडेही लक्ष देण्यात येते, त्याचे कारण शुभ लक्षणांनी युवत दार लक्ष्मीला आमंत्रित करण्यास मदत होते.
सणाच्या काळात घरातील वातावरण धूप-उदबत्यांनी सुगंधित करण्याचीही परंपरा आहे. तसे पाहिले तर इतर दिवशीही घरात कोणत्याही प्रकारची दुर्गंधी असू नये. शास्त्रानुसार ‘सुगंधिम पुष्टिवर्धनम्' लक्ष्मीला आमंत्रित करण्यापूर्वी जुन्या व निरुपयोगी वस्तूंना निरोप देणे गरजेचे मानले जाते. म्हणून दिवाळीच्या निमित्ताने घरातील जुन्या वा खराब झालेल्या वस्तूंची विल्हेवाट लावली जाते व त्याची जागा नवीन वस्तू घेतात. या सणाच्या निमित्ताने बहुतेक जण नवनवीन कपडे घेतात, नवनवीन वस्तूच्या खरेदीकडे लोकांचा कल असतो. या निमित्ताने आप्त-नातलग, सग्या-सोयऱ्यांना फराळाच्या निमित्ताने आमंत्रित केले जाते, व त्यांना घरात, निरनिराळे पववान्न खायला दिले जाते. सदरचे पववान्न घरातच बनवले जायचे, त्याचीही तयारी दिवाळीच्या चार-पाच दिवस अगोदरपासून केली जायची. जेणेकरुन ऐन दिवाळीत तारांबळ व्हायला नको. करंज्या, विविध प्रकारचे लाडूृ, शंकरपाळी, अनारशी नानाविध पदार्थांची रेलचेल केली जाते.
या काळात कुटूंबातील इतर महत्त्वाच्या व्यवित, कामानिमित्त बाहेरगावी असतील त्यांनाही घरी बोलावले जाते. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी व मंगलमय होऊन जाते. परिणामस्वरुप घरातील सर्व सदस्यात सुसंवाद वाढण्यास मदत होते, व सर्वजण सुखाचा व आनंदाचा आस्वाद घेतात; सर्वजण मिळून देवाची पूजा, आराधना करुन एकमेकांच्या भविष्यासाठी शुभकामना करतात.
दिवाळी या सणाला प्रकाशाच्या रोषणाईचा सण म्हणूनही ओळखले जाते. म्हणूनच या सणाच्या काळात अंगणापासून घरातील देवघरांपर्यंत विविध प्रकारची रोषणाई केली जाते. घरावर ‘एल ई डी' च्या बल्बच्या माळा लावल्या जातात, मुख्य दारात आकाश कंदिल टांगला जातो, तर रात्रीच्या वेळेला अंगणासह घरासमोर पणत्या पेटवून ठेवल्या जातात, त्याही आपल्या मंद प्रकाशाने अंगण व घर उजळून टाकतात.
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व आपापली नाती टिकवण्यासाठी एकमेकांना, त्यांच्या त्यांच्या पसंतीच्या गोष्टी भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. ज्यामुळे त्यांच्यातील दृढता वाढते. आपल्या पूर्वजांनी व जाणकारांनी दिवाळीच्या फराळाची रचना विज्ञानाला धरुन केल्याचे जाणवते. दिवाळीत मुख्य भर गोडधोड व पंच पववान्नावर दिला गेला आहे. त्याचे असे की, दिवाळीनंतर येणारा ‘हिवाळा' हा थंडीचा मोसम म्हणून ओळखला जातो, थंडीच्या दिवसात रवत गोठवणारी थंडी असल्याने लोकांना अपचनाचा विकार होत असतो, तो विकार टाळण्यासाठी अंगात गरजेपूरती उष्णता असणे गरजेचे असते. आपल्या जठाराग्नीचे तापमान वाढवणारे इंधन म्हणजे गोड पदार्थ, हे पदार्थ खाल्याने शरीराचे तापमान वाढते हा त्यामागचा हेतू आहे.
श्रीमंताना गोडधोड खाण्यात कसलीच अडचण नसते, ते इतर दिवशीही गोडधोड खाऊ शकतात. पण, गोरगरिबांना गोड खाण्याची संधी ववचितच मिळते, त्याचा मेळ साधण्यासाठी हिवाळापूर्व सण, दिवाळीतील पाच दिवसात रोज विविध प्रकारचे गोड पदार्थ खाण्याचे सांगितले आहे. त्यामुळे गोरगरीब तथा सर्वच जण या सणाच्या निमित्ताने गोड पदार्थांवर ताव मारतात. त्यापासून मिळणाऱ्या उर्जेचा असर पुढील चार महिने टिकून राहतो व आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
या सर्व आनंदी वातावरणात वावरतांना सर्वांचे मन प्रफुल्लीत व टवटवीत होणे यात नवल नाही. म्हणूनच हा सण केवळ हिंदूच साजरा करतात असे नाही, तर सर्वच धर्मातील लोक हा सण विविध प्रकारे साजरा करतात.
दीपावली नाव ऐकताच बच्चे कंपनी अधिक खुश होतात. कारण त्यांना या निमित्ताने फटाके फोडण्याची सुवर्ण संधी मिळते. त्यापासून त्यांना खूप आनंद मिळतो. खरं तर फटाके फोडण्याची परंपरा चीनमधून आलेली आहे. असे सांगितले जाते की, तेथील एका राजाने दुसऱ्या क्रुर राजाचा पराभव करुन विजय मिळवला, तो आनंद साजरा करतांना त्याने फटावयांची आतषबाजी केली, त्यात त्याने निरनिराळ्या आवाजाचे फटाके फोडले, तसेच निरनिराळ्या रंगाच्या ज्योती निर्माण करणारे फटाकेही फोडले. तेव्हापासून दिवाळीच्या सणात फटाके फोडण्याची पद्धत भारतात आली.
भारतातील शिवकाशी या दक्षिण भारतातील शहरात सर्वात जास्त फटावयांचे कारखाने आहेत तेथून केवळ भारतच नव्हे तर जगभरात विविध प्रकारचे, रंगारंग करणारे फटाके पाठवले जातात. त्याला जगभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
भारतात गावा-गावात विविध देव देवतांच्या जत्रा भरतात. त्यात भाविकांच्या रंजनासाठी रात्रीच्या वेळेत फटावयांच्या आतषबाजीचे आयोजन केले जाते, याला आकर्षित होऊन आता जगभरातही अशा आतषबाजीचे आयोजन केले जात आहे. खरं तर दिवाळी साजरी करण्याची परंपरा, आयोध्येचा राजा यांचा थोरला पूत्र राम यांनी आपला चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करुन व रावणाचा वध करुन आयोध्येला परतण्याच्या महापर्वाला दिवाळीचे रुप दिल्यापासून झाली आहे.
प्रभू श्रीरामानी आपल्या वडिलाचे, आपल्या दुसऱ्या आईला दिलेले वचन पाळून १४ वर्ष वनवास पत्करला, वनवासात अनेक संकटावर मात करत, जीवन जगून, शेवट गर्विष्ठ रावणाचा वध करुन, रामाने दिवाळीच्या अमावस्येला अयोध्येत आगमन केले, त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने अयोध्यावासीयांनी, आपापल्या घरा-दारात रोषणाई केली, त्या काळात विजेचे दिवे नव्हते, पण लोकांनी मातीच्या पणत्यात तेल वातीच्या सहाय्याने दिवे लावून, अमावस्येची काळी रात्र तेजोमय करुन श्री रामाचे स्वागत केले व घरात गोडधोड पदार्थांचे सेवनही केले. हिच परंपरा आजही कायम आहे.
या सणाच्या निमित्ताने घरातील नात्यात गोडवा तर आलाच; पण इतर सर्व क्षेत्रातही गोडवा निर्माण करणाऱ्या परंपरा सुरु झाल्या. जसे की, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मजूरांना, मालकांनी आपल्या नपयाचा काही भाग बोनस म्हणून वाटण्याचा असो की, सरकारी, निमसरकारी वा इतर आस्थापनातील लोकांना मिळणारे सानुग्रह अनुदान असो, या निमित्ताने कर्मचाऱ्यांच्या हातात, पगाराव्यतिरिवतचा पैसा खळखळू लागला व त्यांनीही आपापल्या जवळच्या लोकांना भेटवस्तू देण्याची परंपरा चालू केली.
परिणामस्वरुप आज भेटवस्तूचा बाजार उभारीला आला आहे. कारखानदार आपापल्या कारखान्यात नवनवीन वस्तुंचे उत्पादन तयार करत आहेत. ते आकर्षक व उपयोगीठरत असल्याने त्यांना मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात नवनवीन आकर्षक वस्तूंनी गजबजला आहे. खरेदीदार बुचकळ्यात पडत आहेत, काय खरेदी करावे, काय नको ते कळेनासे झाले आहे, तरीही लोक आर्थिक स्थितीनुसार भेटवस्तू खरेदी करुन आपापल्या जवळच्यांना व नातलगांना भेटवस्तू देत आहेत.
आता नवीन एक प्रकार अस्तित्वात आला आहे तो म्हणजे ‘रिटर्न गिपट'चा. या प्रकारात ज्याने गिपट म्हणून काही दिले असेल, त्याला ‘रिटर्न गिपट'च्या रुपात काहींना काही परतावा करतात. एकूणच कोणाला कोणाच्या उपकारात राहाणे आवडेनासे झाले आहे. जो तो आपल्या मनाचा राजा होऊ पहात आहे. कोणाला स्वतःला कमी म्हणून घेण्यात रस नाही. ‘हम भी कुछ कम नहीं है!'
श्रीमंत लोक या ना त्या कारणाने पाटर्यांचे आयोजन करतात व पाहुण्याना भेटवस्तू देतात, तीच परंपरा आता खालपर्यंत पोहोचत चालली आहे. या निमित्ताने माझ्यातर्फे व ‘आपलं नवे शहर' परिवारातर्फे सर्वांना दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा! - भिमराव गांधले