‘हृदयी राजा' मध्ये अंतरीचे बोल
‘हृदयी राजा' हा डॉक्टर अनिल तांबे यांचा जीवन प्रवास वर्णन करणारा आत्मचरित्रपर, स्व-कथपर असा लेखसंग्रह त्यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच प्रकाशित झाला. हा जीवन प्रवास प्रफुल्ल चिटणीस यांनी लिहिला आहे.
लेखन, मुद्रित शोधन वगैरे सर्व कामांची जबाबदारी निलेश गायकवाड आणि टीम या सर्व मंडळींनी, चोख बरोबर उत्तम रीतीने पार पडली आहे. पुस्तकाची प्रस्तावना रमाकांत देशपांडे नाशिक यांनी दिली आहे. या पुस्तकात वेगळ्यावेगळ्या स्तंभांचे मालास्वरूप गुंफण आढळतो. कौटुंबिक स्तरावरील अनिल तांबे यांचा जीवन प्रवास, त्यांचं सहकाऱ्यांशी आणि आपल्या रुग्णांशी असलेले चांगले संबंध, करियर याबद्दलचं वर्णन या पुस्तकात आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची अवचित भेट (पृष्ठ ३३) हा एक विस्मय जनक स्तंभ पुस्तकात आहे. आपले सगळ्यांचे लाडके आनंद दिघे यांना हृदयविकारावर सल्ला दिल्याचा उल्लेख पृष्ठ ८६ वर आहे. सरहद्द गांधींवरचे उपचार (पृष्ठ ४४) अचंबित करतात.
सहजीवनातील पत्नींसोबतचे आनंदाचे क्षण आणि पत्नीची रसिकता याचे उत्तम वर्णन त्यांनी त्याच्यात केलं. अश्विनीच्या जाण्याचं दुःख त्यांच्या या लेखातून दिसून येतं. डॉक्टर अनिल यांची बहीण शुभांगी अस्थी शिरता (ओस्टियोपोरोसिस) आजाराचे निदान परदेशात कॅनडात झाल्यावर उपचारानी बर वाटेना. बंधू अनिल यांनी तिला भारतात आणलं आणि तिला मानेचा कॅन्सर निघाला. पण तिचा मृत्यू झाला; कारण की औषधोपचार करायला उशीर झाला होता.
निशांत आणि कन्या तन्मय यांच्यासोबत डॉक्टर आपलं वय वर्षे ८० पुढचं जीवन आनंदाने व्यतीत करत आहेत. आमचे वडील म्हणायचे योग्य वेळी योग्य डॉक्टर मिळणं त्याला योग्य निदान होणं आणि वेळीच औषधोपचार होणं फार महत्त्वाचं असतं. आजार अपमृत्यू हे तर डॉक्टरांनासुद्धा चुकत नसतात. डॉक्टर उपचार करतात, बरं करणारा हा वरचा परमेश्वर असतो. तसे सत्य असले तरी डॉक्टर्सनी छान यश मिळवून रुग्ण बरे केले. योगाचे देखील उत्तम ज्ञान डॉक्टर अनिल तांबे यांना आहे.
हृदयविकारात ईसीजी महत्त्वाचा असतो ज्यामुळे आजाराचं निदान होतं. तसेच प्रत्यक्ष आयुष्यात देखील इसीजी महत्त्वाचं असतं, असे मिलिंद बल्लाळ यांनी प्रास्ताविकात सांगितलं. इ एज्युकेट सी कम्युनिकेट आणि जी गिव्ह! तसं चांगलं माणूस बनणं आवश्यक आहे हे मला या पुस्तकातून उमगलं.
पुस्तक - हृदयी राजा लेखक : प्रफुल्ल चिटणीस
कॉपीराईट : डॉक्टर अनिल तांबे मुखपृष्ठ : मिलिंद नार्वेकर
प्रकाशक : व्यास क्रिएशन, ठाणे
पृष्ठे : २०८ मूल्य : ५०० रुपये
-शुभांगी पासेबंद