२४ ऑक्टोंबर.. संयुक्त राष्ट्र दिवस

आतापर्यंत गाजा व इस्रायलच्या युध्दात हजारो निष्पाप लोकांचा बळी सुध्दा गेला आहे व जात आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या महायुध्दाची ठीणगी केव्हाही उडु शकते. त्याचप्रमाणे चीन-तैवान संघर्ष सुरूच आहे. अशा भयावह स्थितीत तिसऱ्या महायुद्धाची पुणरावृत्ती होणार नाही याची दक्षता संयुक्त राष्ट्रसंघाने घेतली पाहिजे. परंतु सध्याच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका संथगतीने दिसत आहे. यामुळे यामुळे जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 हमास-इस्त्रायल-इराण व युक्रेन-रशिया युद्ध पहाता संयुक्त राष्ट्रसंघाचीठबघ्याची भूमिका चिंताजनक. जगातील काही भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे व याचा गंभीर परिणाम जगातील तळागाळातील देशांवर होत आहे. या बाबी संयुक्त राष्ट्र उघड्या डोळ्यांनी पहात आहे. परंतु यावर तोडगा किंवा कोणतीही कठोर ॲक्शन घेतांना दिसत नाही ही जगासाठी अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.२०२० मधील अजरबैझान-आर्मेनिया युद्ध, २०२१ चे अफगाणिस्तान-तालिबान युद्ध, २०२२ पासुन आतापर्यंत सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आणि आता नुकताच सुरू झालेला हमास-हिज्बुल्ला-इराण व इस्त्रायलचा भयावह संघर्ष यामुळे जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. अशा भयावह स्थितीमध्ये परमाणू युध्दाची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे युद्ध आता हमास-हिज्बुला-इराण व इस्त्रायल युद्ध किंवा रशिया-युक्रेन युद्ध सीमित रहाले नसुन दोन बलाढ्य वेगवेगळ्या लढवण्याची  दाट शक्यता आहे.

आज रशिया-युक्रेन संघर्षात युक्रेनकडून नाटो पुर्णपणे ताकदीनी रशियासोबत लढत आहे.तर हमास-हिज्बुल्लाकडून इराण संपूर्ण ताकदीनिशी लढत आहे व इस्त्रायल कडून अमेरिका व मित्रराष्टे्र ताकदीनीशी उभे आहेत. यामुळे जगातील बलाढ्य देश दोन तुकड्यांमध्ये वाटले जाऊ शकते आणि तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हमास व हिज्बुल्लाला  इराण संपूर्णपणे खुली मदत करीत आहेत. तर दुसरीकडे इस्रायलच्या शेजारच्या राष्ट्रांच्या आतंकवादी संघटना इस्रायलवर बंदुक ताणून बसले आहेत. यामध्ये गाजामधील हमास व इस्लामिक जिहाद आतंकवादी संघटना, लेबनॉन मधील हिजबुल्ला, मिस्त्रमधील मुस्लिम ब्रदरहुड, सीरियामधील (आय.एस.आय.एस.) अलनुकसार फ्रंट अलकायदा अशा प्रकारे आतंकवादी संघटना इस्त्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. परंतु इस्रायल सर्वांनाच चांगल्याप्रकारे शिकस्त देत आहे. परंतु आतापर्यंत गाजा व इस्रायलच्या युध्दात हजारो निष्पाप लोकांचा बळी सुध्दा गेला आहे व जात आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या महायुध्दाची ठीणगी केव्हाही उडु शकते. त्याचप्रमाणे चीन-तैवान संघर्ष सुरूच आहे. अशा भयावह स्थितीत तिसऱ्या महायुद्धाची पुणरावृत्ती होणार नाही याची दक्षता संयुक्त राष्ट्रसंघाने घेतली पाहिजे. परंतु सध्याच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका संथगतीने दिसत आहे. यामुळे यामुळे जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत गेल्या अडीच वर्षांपासून  रशिया-युक्रेन युद्ध किंवा आता सुरू असलेला हमास-हिज्बुल्ला- इराण-इस्त्रायल संघर्ष जगाला केव्हाही हादरा देवू शकते. सध्या निर्माण झालेली जगातील विध्वंसकारी परीस्थिती पहाता संयुक्त राष्ट्रसंघानेठ मानव कल्याणासाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. परंतु संयुक्त राष्ट्रसंघाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. आज संयुक्त राष्ट्रसंघ ७९ वर्षांचा झाला असला तरीही जगात संघर्ष कमी न मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही अत्यंत चिंताजनक व गंभीर बाब आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना अनेक देशांतील घडामोडीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत असते. पहिल्या महायुद्धानंतर १९२९ मध्ये राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली.परंतु राष्ट्रसंघ प्रभावहीन असल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघटनेची२४ आक्टोंबर १९४५ ला स्थापना करण्यात आली. यावेळी संयुक्त राष्ट्र अधिपत्रावर ५० देशांच्या सह्यानीशी याची स्थापना करण्यात आली. परंतु आता जगातील अनेक देश संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य आहेत. यामुळे प्रत्येक देशाला आप-आपल्या तक्रारी मांडण्याचा अधिकार संयुक्त राष्ट्रसंघटनेने दिलेला आहे. युध्द जन्य परीस्थिती,भुकमरी, कुपोषण,मानवधिकार, आंतराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती आणि विर्श्व शांति इत्यादी संपूर्ण बाबींनवर चर्चा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून केली जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर विजयी झालेल्या देशांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्राला आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेचा उद्देश हा आहे की भविष्यात द्वीतिय महायुध्दासारखी महाभयानक परीस्थिती उदभवु नये. संयुक्त राष्ट्र संघटनेची संरचना शक्तीशाली देश अमेरिका,फ्रांस, ब्रिटन, रूस आणि संयुक्त राजशाही यांनी द्वितीय विश्व युध्दात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. सध्याच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघटनेमध्ये १९३ देश आहेत. जगातील सर्वच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त देश या संस्थेशी जुडुन आहेत. या संस्थेची संरचना,आम सभा, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक परिषद, सचिवालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय या संपूर्ण बाबीं या संस्थेमध्ये आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना ही एक चांगली आंतरराष्ट्रीय उपयोगी संघटना आहे. गेल्या २० वर्षापासुन अफगाणिस्तानमध्ये अमेरिका व नाटोची सेना होती. यामुळे अफगाणिस्तानची जनता स्वतःला सुरक्षित समजत होते. परंतु अमेरिकेने २०२१ मध्ये आपले सैन्य माघारी बोलावल्यामुळे अवघ्या १०० दिवसात खुनी तांडव निर्माण होवून लाखो निरपराध्यांचा बळी तालिबानी आतंकवाद्दांनी घेतला व अफगाणिस्तानवर संपूर्ण कब्जा मिळविला आणि अफगाणिस्तानला रक्ताच्या लाथोळ्यात लोटले. परंतु यात संयुक्त राष्ट्र संघाने थोडासाही हस्तक्षेप केला नाही ही संयुक्त राष्ट्रसंघाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून पाकिस्तान नेहमी भारताच्या विरूद्ध चिखलफेक करीत असतांना दिसुन येते. सिरियामधील अत्याचाराच्या घटना संयुक्त राष्ट्रसंघापुढे मांडुन या घटना जम्मु काश्मिरमध्ये घडत असल्याचे सांगून भारत मानवाधिकाराचे उल्लंघन करीत असल्याचा कांगावा पाकिस्तान नेहमीच करीत असतो. कारण भारतीय घटनेतील ३७० व ३५ ए कलम हटविल्याचे दुःख पाकिस्तानला जास्तच होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा मुद्दासुध्दा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये अनेकदा नेलेला आहे. परंतु संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानचे संपूर्ण आरोप फेटाळून लावले. आज संयुक्त राष्ट्र संघ नसता तर जगामध्ये अनेक देशात आपसा-आपसात गृहयुद्ध पहायला मिळाली असती. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून अनेक राष्ट्रांमध्ये होत असलेला संघर्ष व कटुता दुर करण्याचे काम आज संयुक्त राष्ट्र संघटना करीत आहे. आज उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात नेहमी तणातणीचे वातावरण दिसायचे; परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्यात आला व युध्दजन्य परीस्थिती हाताळण्याचे काम केले. उत्तर कोरियाचा तानाशहा किंम जोंग उन हा नेहमी अमेरिकेला युध्दाची धमकी देत असतो आणि आताही देत आहे. परंतु संयुक्त राष्ट्रसंघटना याला हाताळण्याचे काम करीत असते. २०२० मध्ये अजरबैझान-आर्मेनिया यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता. य्संयुक्त राष्ट्र संघाने अजरबैझान-आर्मेनिया यांच्यातील संघर्ष थांबवीण्या करीता युध्दपातळीवर प्रयत्न करून युद्ध  थांबवले. अन्यथा मुस्लिम राष्ट्र विरूद्ध ईसाइ राष्ट्र अशी युद्धाची स्थिती उद्‌भवण्याची शक्यता होती. अशी कठीण परिस्थिती निवळण्याकरीता संयुक्त राष्ट्र संघाने टोकाची भूमिका घ्ोणे गरजेचे असते. चीनची विस्तारवादी नीती रोखण्याकरीता व पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया रोखण्याकरीता पश्चिम आशियात नवे क्वाड स्थापन करण्यात आले आहे. यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जापान हे देश आहेत. यामुळे आशिया खंडात शांतता प्रस्थापित करण्यास मोठी मदत होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघ जरी ७९ वर्षांचा झाला असला तरी त्यात नवीन उर्जा निर्माण करून जगातील संघर्षमय वातावरण यावर ताबडतोब अंकुश लावण्याची गरज आहे. कारण संयुक्त राष्ट्र संघाने अनेक महत्वपूर्ण कार्य केले आहे याचे उदाहरण जगापुढे आहे. पाकिस्तान आताही खुंखार आतंकवाद्यांना खतपाणी घालत आहे व भारतविरोधी कारवाया करीत असतो. परंतु भारत त्याला जशास तसे उत्तर देऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम करीत असतो. संयुक्त राष्ट्र संघटनेला भारताने सिध्द करून दाखवले की भारत विश्वामध्ये शांती प्रस्थापित करू शकते. भारताचे प्रखर नेत्यृत्व व प्रखर विचाराने संपूर्ण संयुक्त राष्ट्रसंघनेतील १९३ देश प्रभावीत आहे. त्यामुळेच आज भारताची मान उंचावली आहे. भारताने नेहमी मानवाच्या कल्याणासाठी व हीतासाठी आवाज बुलंद केला आहे. भारताने आणि संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानला नेहमी रक्ताच्या थारोळ्यातुन बाहेर काढण्याचे प्रयत्नसुध्दा  केले आहे. परंतु पाकिस्तानच्या वागणुकीवरून असे दिसून येते की कुत्र्याचे शेपूट वाकडे ती वाकडेच!

आज जगात कोणत्याही देशांशी वैरत्व करने म्हणजे तिसऱ्या महायुद्धाकडे वळने होय. देशा-देशामध्ये कटुता निर्माण होवु नये किंवा कटुता निर्माण झाली तर ती निवळण्याकरीता आज संयुक्त राष्ट्र संघटना रोखठोक भुमिका बजावण्याचे काम करीत आहे. अन्यथा महायुद्ध केंव्हाही उद भवले असते. परंतु यावर ब्रेक आणि लगाम लावण्याचे काम संयुक्त राष्ट्र संघटना करीत आहे. आज जगातील देशांकरीता काही निर्णय घ्यायचा असला तर सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र संघ भारताशी संवाद करून निर्णय घेत असतो. संयुक्त राष्ट्र संघटनाठही जगाला जिवनदान देणारी संस्था असल्याचे मी समजतो.परंतू सध्याच्या इस्त्रायल-हमास-इराण-हिज्बुल्ला व रशिया-युक्रेन युद्ध याबाबत कठोर पाऊल न उचलता संयुक्त राष्ट्र संघ बघ्याची भूमिका अदा करीत आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. २१ व्या शतकात मानवी युध्दापेक्षा आता  द्रोणनेठयुध्द सुरू झाल्याचे दिसून येते.द्रोणचे युध्द जगाला घातक सीध्द होवु शकते व होत आहे आणि जगाला विनाशाकडे नेवू शकते.कारण अत्याधुनिक युगात संपूर्ण देश सध्याच्या परीस्थितीत अत्याधुनिक शस्त्र सामग्री, अणुबॉम्ब, मिसाईल, बॅलेस्टीक, क्लस्टर बॉम्ब, अणुबॉम्ब, अत्याधुनिक द्रोण, अशाप्रकारचे विनाशकारी आणि घातक शस्त्रसामग्री जगातील संपूर्ण देशांनी अवगत केली आहे. आज संपूर्ण देश अत्याधुनिक द्रोण खरेदीच्या शर्यतीत आहे व प्रत्येक देश यात सामोरं जाण्याच्या शर्यतीत आहे. यावर संयुक्त राष्ट्र संघाने लक्ष ठेवण्याची गरज आहे. अन्यथा पृथ्वीचा विनाश दुर नाही. १९४५ ला संयुक्त राष्ट्रांची परीस्थिती वेगळी होती. परंतु गेल्या ५ वर्षात संपूर्ण जगात अत्यंत संघर्षमय व भयावह वातावरण निर्माण झाले आहे. याकरीता संयुक्त राष्ट्र संघाला आणखी कडक नियमावली तयार करून जगातील खुनी संघर्ष थांबवीलाच पाहिजे. १९४५ च्या नंतरची आव्हाने आवश्यकतेनुसार वेगळी होती. परंतु आज संपूर्ण जगापुढे वेगळ वेगळे आव्हान आहे. पण ज्या हेतूने संयुक्त राष्ट्रांची स्थापणा झाली तो हेतू आजही आहे का ? असा प्रश्न जगापुढे उपस्थित आहे.जगात पुर्वीही गृह युद्ध व्हायची आणि आजही अनेक देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. परंतु आजचे गृहयुद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या दीशेने वाटचाल करतांना दिसत आहे. आज संपूर्ण जगावर संयुक्त राष्ट्र संघाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना यासाठीही करण्यात आली की दुसऱ्या महायुद्धासारखी परीस्थिती पुन्हा उद्‌भवु नये. परंतु दुःखाची बाब म्हणजे आज संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. जगातील बदलता काळ पहाता व युध्दाची गंभीर परिस्थिती पहाता संयुक्त राष्ट्र संघाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. - रमेश कृष्णराव लांजेवार 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी