फटाक्यांमुळे होते प्रदूषण
फटाक्यांमुळे प्रदूषण तर होतेच, श्वसन विकारात वाढ होते, फटाक्यांच्या महाभयंकर आवाजाने कानाचे पडदे फाटायची वेळ येते. आजाऱ्यांना त्रास होतो. पशुपक्षी, प्राणी भयभीत होतात. अनेक सूक्ष्म जीवांची हत्त्या होते. माचिसने गँस, स्टोव्ह पेटवतो, ते आपल्या हिताचे आहे, आपण त्यावर स्वयंपाक बनवतो. पण ज्योती जेंव्हा ज्वाला बनते, प्रचंड आग बनते तेंव्हा सारे जीव घेऊन सैराभैरा जीव घेऊन वाट मिळेल तिकडे पळत सुटतात. तेव्हा सारे गरीब, श्रीमंत जीव वाचवण्यासाठी धडपडतात. सुतळी अँटम बाँम्ब, बाण, पाउस हे फटाके बाजारात येउ नये यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे. फटाके निर्मिती ठिकाणी जाऊन ते जप्त करावे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच आहे. दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडावे असे बंधन सर्वोच्च न्यायालयाकडून नागरिकांना घालण्यात आले आहे, पण त्याचे कठोर पालन होईल असे वाटत नाही. गणपतीचे स्वागत गुलाल उधळत, फुले पुष्प पाकळ्या उधळत, भगवे झेंडे उंचावत थाटामाटात करा. रसभंग होईल असे काही करू नका. आमचा सण दिवाळी वर्षांतून एकदा येतो.. मग आम्ही तेव्हा फटाके वाजवायला बंधन आम्हाला मान्य नाही असे म्हणणारा बहुसंख्य वर्ग असेल. सण, उत्सव यावर बंदी हवीच कशाला? असेही ते म्हणतील. पण हीं काळाची गरज आहे हे समजून नको का घ्यायला? शाळेची वेळ, कामाची वेळ ठरलेली असते, हे बंधन आपल्या हिताचेच आहे असे समजून त्याचे पालन करावे. आपल्या आरोग्य जपण्यासाठी त्याचे पालन करा.
फटाक्यांमुळे जीवित हानी भरून निघणे शक्य नाही. श्वसनाचे रोग ,विकार होतात. पक्षी प्राणी भयभित होतात. आगी लागतात. तेव्हा अपरिमित नुकसान होते, कमी आवाजाचे हरित फटाके वाजवून दिवाळी साजरी करा. वेळेचा भंग करू नका, दिवाळीत रसभंग होईल असे वागू नका, त्यातच आपले हित आहे. प्रदूषणाने आरोग्य बिघडून फुकट वैद्यांकडे जाऊन बिले भरू नका. अनार, पाउस तर अजिबात लावू नका. अनार फटाका फुटत नाही तेंव्हा फुकंर मारायला जाऊ नका. अनेकांची तोंड भाजून चेहरा विद्रूप झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापेक्षा गरीब वस्तीत जाऊन फटाक्यांच्या बदली मिठाई घेऊन त्यांना मुलांना वाटा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पहा, तुम्हीही आनंदून जाल. असे माझे वैयक्तिक मत आहे. मुलांच्या समाधानासाठी केवळ फुलबाज्या लावा. फटाके मोकळ्या मैदानात मुलांनी वाजवताना मोठ्यांनी मुलांवर लक्ष ठेवून दक्षता बाळगावी. - सुभाष जैन