कुकशेत येथे आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर संपन्न

नवी मुंबई ः ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस'च्या नेरुळ पश्चिम तालुका अध्यक्षा शालिनी अंकुश म्हात्रे यांच्या पुढाकाराने कुकशेत येथे आरोग्य तपासणी आणि रवतदान शिबीराचे १८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिरात नेरुळमधील सुमारे ३०० नागरिकांनी  लाभ घेतला. तसेच यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ५० बॉटल रक्त संकलन करण्यात आले.

नेरुळ, सेवटर-१४ कुकशेत मधील महापालिका शाळा क्र.११ येथे संपन्न झालेल्या शिबीरात सानपाडा येथील सुरज हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर. एन. पाटील, कृपा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखालील डॉक्टरांच्या पथकाने शिबीरार्थींची मेंदू, मणका, हृदय, ऑर्थोपेडिक, कान, नाक, दंत, मानसिक विकार यासह विविध आजारावर तपासणी करुन काहींना मोफत  औषध वाटप केली.

सदर महाआरोग्य शिबीराप्रसंगी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, महिला निरीक्षक  भावना घाणेकर, ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा सलुजा सुतार, कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, आदिंसह इतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शेकापच्या ताब्यातील करंजाडे, शिवकर, भाताण ग्रामपंचायत भाजपकडे; नेरे, दिघाटी, चिंध्रण ग्रामपंचायत राखण्यातही भाजपला यश