नवी मुंबई शहरातील उद्यानांचा ताबा मद्यापिंकडे ?

नवी मुंबई-:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील उद्याने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र सध्या या उद्यानांचा आणि विरुंगळा केंद्रांचा ताबा मद्यपी आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांनी घेतला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन व अंमली पदार्थ सेवन केले जात आहे. त्यामुळे या उद्यानांची सुरक्षा अधिक कडक करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

देशासह राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वत्र २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.नवी मुंबई महानगर पालिके देखील कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून  शहरातील गर्दी जमणारी ठिकाणे बंद केली होती.त्यामुळे नवी मुंबईतील उद्याने देखील बंद ठेवण्यात आली होती.मध्यंतरी ही उद्याने खुली करण्यात आली होती.मात्र कोविड संसर्ग वाढल्याने ही उद्याने पुन्हा बंद ठेवण्यात आली आहेत.या उद्यानात बहुतांश ठिकाणी जेष्ठ नागरीक विरुंगळा केंद्रे आहेत आणि ती देखील बंद आहेत.मात्र या बंद असलेल्या उद्यानांचा आणि विरुंगळा  केंद्रांचा ताबा आता मद्यपी आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांनी घेतल्याचे चित्र नवी मुंबईत दिसत आहे. वाशी सेक्टर १ मधील उद्यानाची देखील हीच अवस्था असून मदयपींचा अड्डा बनला आहे. त्यामुळे  अशा उद्यानांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मगणी होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मागणी