रम्य ही स्वर्गाहून लंका  

श्रीलंकेचे पूर्वीचे नाव सिलोन. आताची राजधानी कोलंबो. या देशाची लोकसंख्या २२ कोटी असून साक्षरतेचे प्रमाण ९२ टक्के आहे. श्रीलंका व भारत यातील कमीत कमी अंतर ५४.८ किलोमीटर आहे. येथील  रामसेतू प्रसिद्ध आहे. एकंदर ९ राज्ये  व २५ जिल्हे श्रीलंकेत आहेत. जॅकलीन फर्नांडिस ही प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलंका देशाची.येथील लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. १९९६ ने श्रीलंकेने वर्ल्डकप जिंकला होता.

    रामायण काळापासून श्रीलंका प्रत्येक भारतीयांना माहिती आहे आणि ती रावणाची लंका म्हणून ओळखली जाते. एक चिमुकला देश ज्याचे क्षेत्रफळ फक्त ६५,६१० चौरस किलोमीटर आहे पण निसर्गाचे जबरदस्त वरदान, सर्वत्र हिरवाई असल्यामुळे निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी पुरेपूर आनंद देणारा हा देश आहे.

    या देशाला ३००० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. २३०० वर्षांपूर्वी हा देश हिंदूधर्मीय होता. मौर्य सम्राट अशोक याच्या काळात पूर्व भारतातून पाठविलेल्या मिशनद्वारे बौद्ध धर्म प्रथम श्रीलंकेत आला व बौद्धधर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. आज ७० टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे तर १३ % हिंदू धर्मिय आहेत. अनेक जमाती, वंश, भाषा असल्या तरी सिंहली व तामिळ ह्या प्रमुख जमाती आहेत. इथे डच, पोर्तुगाल, ब्रिटिश वसाहती होत्या. १८१५ ते १९४८ पर्यंत ब्रिटिश सत्ता होती. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून श्रीलंका ४ फेब्रुवारी १९४८ ला मुक्त झाले. श्रीलंकेत १९८३ ते २००९ या काळात गृहयुद्ध होते. या युद्धाचा शेवट श्रीलंकेच्या सशस्त्र दलाने लिब्रेशन टायगर्स ऑफ तामिळचा पराभव करण्यात झाला. श्रीलंकेचे पूर्वीचे नाव सिलोन. आताची राजधानी कोलंबो. बंदर नायके हा येथील एकमेव आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट. देशाची लोकसंख्या २२ कोटी असून साक्षरतेचे प्रमाण ९२ टक्के आहे. श्रीलंका व भारत यातील कमीत कमी अंतर ५४.८ किलोमीटर आहे. येथील  रामसेतू प्रसिद्ध आहे. श्रीलंकेचा ध्वज - सिंहध्वज हा जगातील सर्वात जुना ध्वज मानला जातो. एकंदर ९ राज्ये  व २५ जिल्हे श्रीलंकेत आहेत. जॅकलीन फर्नांडिस ही प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलंका देशाची. श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ हा फुटबॉल असला तरी पॉप्युलर खेळ हा क्रिकेट आहे. १९९६ ने श्रीलंकेने वर्ल्डकप जिंकला होता.

पर्यटनाच्या दृष्टीने श्रीलंका खूपच छान आहे. कोलंबो ही राजधानी म्हणजे पूर्व पश्चिमेचे सुंदर मिलाफ. शहर अतिशय स्वच्छ आहे.  येथील गंगाराम बुद्ध मंदिर पाहण्यासारखे आहे. कोलंबोला लाभलेला अतिशय सुंदर समुद्रकिनारा हे येथील वैशिष्ट्य आहे. येथील  हंबनटोटा बंदर चीनने पूर्णपणे विकत घेतले असून त्याचा सर्वांगिण विकास चीन करीत आहे. श्रीलंकेतील दुसरे महत्त्वाचे ठिकाण दंबूला गुंफा मंदिर. हे एक डोंगरावर असून जगातील सर्वात मोठे रंगविलेले भगवान बुद्धाचे गुंफा मंदिर आहे. सिगारिया या नावाचे दुसरे गुंफा मंदिर आहे. सिगरिया किल्ला ६०० फूट उंच आहे. श्रीलंकेतील अजून एक सुखावह ठिकाण म्हणजे हरबणा खेडे. त्याच्याजवळ असलेले मिनेरीया सफारी पार्क आहे जिथे एकाच वेळी १०० हत्ती दिसू शकतात. तेथून जवळच त्रिकोमल्ली हे बंदर  व शहर जवळ आहे. त्रिकोमल्लीचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे. कोलंबोपासून अडीचशे किलोमीटरवर हे शहर आहे. श्रीलंकेचे सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे ‘कँडी स्थळ'. सुंदर हवामान आणि भव्य मंदिर याकरिता प्रसिद्ध आहे. येथे भगवान बुद्धाचा पवित्र दात आहे. येथील एका प्रेक्षागृहात लोकांना सांस्कृतिक कार्यक्रमही दाखवले जातात. कॅन्डीपासून ३० किलोमीटर अंतरावर पिनावाला ही हत्तींची शाळा व अनाथालय आहे. हत्ती नदीत स्थान करण्यासाठी जातात व खेळतात, मस्ती करतात हे पर्यटकांचं लोकप्रिय आकर्षण आहे.निवारली या एक सुंदर ठिकाण म्हणजे गर्द  झाडीत लपलेले  ठिकाण. येथील जवळील लेकमधील नौका विहार आनंददायी  आहे.

 चहा निर्मितीत श्रीलंका आघाडीवर आहे. श्रीलंका शेतीप्रधान देश  आहे. तांदूळ व करी हे त्यांच्या आहारातील  प्रमुख  पदार्थ. पिट्टू, किरिबथ, स्ट्रींग  हॉपर्स, वट्टलपाम ( नारळाचे  दूध ), कोट्टु, अप्पम हे  पदार्थ आहारात  असतात. इसाला पेराहेरा हा  एक बौद्धसण ज्यात नृत्य व सजविलेले  हत्ती असतात. असा हा एक सांस्कृतिक, विविध परंपरा जपणारा, हिरवाईने नटलेला  भारताचा शेजारी श्रीलंका देश प्रत्येकाने पाहिला पाहिजे. -  राजन पाडलोसकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आचारसंहितेचे पालन करताना काय करावे आणि काय करू नये?