कांगारू

कांगारू हा एक वन्यप्राणी! पोटाजवळील नैसर्गिक पिशवीत आत्मीयतेने दडवलेले आपलेच लाडके मूल झटकन बाहेर काढून मिळेल ते फूल-फळ स्वतः खाणार व आपल्या आईला आणून देणार. हा रानावनात जगणाऱ्यांचा एक मार्ग असावा! ते आपण समजू शकतो. पण ते तसेच जर माणूस म्हणून कुणी केल्यास, जंगली स्वभाव माणसात का व कसा अवतरला? हा प्रश्न घातक आहे, उत्तर मात्र समाजाने शोधायचे आहे. आजच!

कोकण परिसरात वानरांचा त्रास सहनशीलते पलिकडे गेल्याने लोकांनी रानावनाचे रक्षण करणाऱ्या शासकीय खात्याच्या शहरी कार्यालयावर नाईलाजाने मोर्चा नेला. आपले गाऱ्हाणे लिखित स्वरूपात साहेबांना दिल्याचे वाचनात आले. उशिरा का होईना, पण हा संघर्ष अटळ होता. त्यावर उपाय म्हणून जीवंत वानर-माकडे पिंजऱ्यात पकडून अभयारण्यात स्थलांतरित करण्याचे काम वन विभागाने सुरु केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सर्व अधिकारी वर्गाचे आभार!

 माकड-वानर या वन्यपशू पासून होणारा अक्षम्य त्रास कमी होण्यासाठी उन्मादाने वावरणाऱ्याना अजूनही कोकणातील भर वस्तीत, दिवसाउजेडी माकड-वानर सर्रास मौजमजेत या बागेतून त्या बागेत धमाल करत असतातना दिसतात. हे प्रत्यक्ष माझ्या बागेतून पाहिले आहे. एक फणस सोडल्यास आंबा, काजू, नारळ सुपारी, रामफळ, चिकू, जाम, काळी मिरी इत्यादी फळं फस्त करण्यांत वन्य प्राणी तरबेज झाले आहेत. त्यांच्यापासून बागेतील फळे फस्त करणारे वन्य पशू दूर रहावेत म्हणून सोलर शक्तीवर चालणारे दोन पलड लाईट्‌स मला लावणे भाग पडले. पीक कमी अन खर्च ज्यास्त अशी दयनीय अवस्था झाली आहे माझी, अन सर्व कोकणातील बागायती शेतक़-यांची! हताश अन निराश कोकणी बागायतदारांनी म्हणूनच मोर्च्याचे प्रयोजन केले असावे, आणि जे प्रत्यक्ष मोर्च्यात सामील झाले नसतील ते शेतकऱ्याच्या मागणीस समर्थन नक्कीच करणार! त्यांस वन अधिकाऱ्यांकडून उशिरा का होईना, प्रतिसाद लाभत आहे. धन्यवाद.

अशी वाईट परिस्थिती असतानाच कुणा रानातून कोणा दोन पायाची विक्षिप्त कांगारू स्वरूप चोरटे प्राणी उडया घेत-घेत सर्वत्र गावभर वावरत आहेत. अर्धा गाव शहरात निघून गेल्याने त्यांना वस्तीतील घरामध्ये कुलूपबंद असलेल्या घरात घुसण्याची आयती संधी चालून येते. बोलणारा कुणी नाही, आक्षेप घेणारा कुणी नाही. जे कुणी असे वागतात त्यांच्या शब्दांत दया नाही, वागण्या बोलण्यात अहंकार भरलेला! जोडीला सोशल मिडिया आहेच! जणू सर्वज्ञानी सर्वव्यापी, सर्व गुणसंपन्न अतिहुशार प्राणी. खरे वन्यप्राणी आणि माणूस यांच्यात एक मुख्यत्वे फरक असा की प्राण्यांना दयाभाव नसतो. ते कष्टाळू नसतात, त्यांना भूक लागली की झाडाझुडुपांमध्ये घुसून मिळेल ते फळ-फूल ग्रहण करतात. त्यांना कायदा कळत नाही. त्यांच्या जगण्यात विशेष शिस्त नसते. ते रानांत जगतात. गुरू-शिष्य, शाळा-कॉलेज असल्या भानगडी त्यांच्याच्याकडून अपेक्षित नसतात. ते ईश्वरी वरदान असावे, त्याना. माणूस हल्ली बेशिस्त वागू लागला आहे. रानटी पशू वागतात तसे, वागू लागला आहे. आपली गरज भागविण्यासाठी म्हणून इतरांना त्रास देत आहे. पण कालचक्र फिरायला वेळ लागत नाही, याचे भान असणे आवश्यक आहे.

कांगारू असाच एक वन्यप्राणी! पोटाजवळील नैसर्गिक पिशवीत आत्मीयतेने दडवलेले आपलेच लाडके मूल झटकन बाहेर काढून मिळेल ते फूल-फळ स्वतः खाणार व आपल्या आईला आणून देणार. हा रानावनात जगणाऱ्यांचा एक मार्ग असावा! ते आपण समजू शकतो. पण ते तसेच जर माणूस म्हणून कुणी केल्यास, जंगली स्वभाव माणसात का व कसा अवतरला? हा प्रश्न घातक आहे, उत्तर मात्र समाजाने शोधायचे आहे. आजच!

पण दोन पायांचा विक्षिप्त प्राणी जर स्वतः कष्ट करणार नाही, तर आपल्या पाल्यास वाममार्गाला लावून मिळेल ते घेऊन येण्यास उन्मत्त करणार असेल आणि आजचा प्रगत समाज जर बघ्याची भूमिका घेणार असेल, तर आज एकावर आफत आलीय, उद्या ती कुणावरही येऊ शकते,हे विसरून चालेल? चोर, चोरी करून मजेत पोट भरतात. यास चोरी म्हणतात, हे त्यांचा शब्दकोष सांगत नसावा कदाचित! धीटपणा, उर्मटपणा आणि निर्लज्जपणे वावरण्याचा जणू अभ्यास केलेला असावा त्यांनी! अशा उन्मत्त प्राण्यांना सपोर्ट करणाऱ्यांची एक दिवस काय अवस्था होईल ते येणारा काळच सांगू शकेल.

कुलुपातल्या घराचा नीट आढावा घेत, दोन पायांचे कांगारू आपले काम आज बेमालूम साधत आहेत. बंद घरातली एकही वस्तू शिल्लक ठेवत नाहीत. हे काम कांगारू स्वतः करत नसुन पोटातल्या पिशवीतील लपवलेल्या लाडक्या व चलाख बाळाकडून मुद्दाम करून घेतात. गावांतील काही नव्याने घिरट्या घालणाऱ्या स्वयंघोषित समाजसेवक मंडळीच्या इशाऱ्यावर करत असावेत, असेही ऐकिवात आहे. त्यांना खाकीचा धाक राहिलेला नसावा. जाड कातडीचे गावठी कांगारू खरंच जास्त काळ टिक धरू शकेल का?  वाटत तर नाही. आता लोक हताश झाले आहेत, म्हणून निराश असावेत. तरीही कोकणात अशी एक म्हण आहे...घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात! ह्याची जण प्रत्येकास असावी!

माकड-वानर हे वन्य प्राणी आहेत. त्यांचे वास्तव्य खरं तर रानांत असावे; पण काही नवविचारी लोकांनी रानांत इमले सजवल्यावर रानातली सजीव माकडे, वानर भर मानव वस्तीत येऊन धुमाकूळ घालू लागली आहेत. पण मानवरूपी दोन पायाची विक्षिप्त रोगीट कांगारू स्वतः समाजात मानसन्मान मिळवून आपल्या पाल्यांकडून जमेल ते सामानाची उचलेगिरी करुन आपला दैनंदिन कौटुंबिक गाडा कसाबसा हाकत आहेत. हेच तर खरे दुखणे आहे. कष्ट नको, वाममार्ग सोपा वाटत असावा. बाहेरुन दयाळू, नम्र, मात्र आंतून क्रूर आणि क्लिष्ट स्वभावाचे उपासक, अशा दोगल्या मानसिकतेत गुर्फटलेली मानवरूपी कांगारू जात, यांचा वेळेत समाचार न घेतल्यास ही घातक बिमारी सर्वत्र पसरू शकते.

आज कोकणातला तरुण पर्यटन या एकमेव आशेवर जगत आहे. मेहनत करत आहे. कष्ट करून आपले कुटुंब सांभाळत आहे. पण चोरी, गर्दुल्लेपणाची लागण वाढत गेल्यास बाहेरुन गावांत येणारा पर्यटक दुखावला गेल्यास, स्थानिकांनी काय करावे? ज्यांना कष्ट करुन घर चालवायचे आहे, त्यांच्या समोर भुरट्या चोरांचा हैदोस आणि नशेबाज व्यवहाराची देवाणघेवाण होत असेल तर ही एक मोठी समस्या आहे. त्वरित यावर उपाय योजिला गेला पाहिजे. अन्यथा कोकण झकास पण कोकणी माणूस हताश व्हायला वेळ लागणार नाही.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन वेळेत अशा ऐतखाऊ मानसिकतेला आळा घातला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. कष्ट करण्याऐवजी चोऱ्या करून समाजात जे मानसन्मान मिळवतात त्यांच्या वागण्यात सुधार येईल असे वाटत नाही! ही दुर्दैवी मानसिकता तूर्तास थांबलीच पाहिजे. स्थानिकांनी लगेच पुढे येऊन  प्रशासनास मदत केली पाहिजे. ही सर्व स्थानिक आणि प्रशासकीय यंत्रणेस आग्रहाची विनंती. जगा अन जगू द्या... असेच जगायचे असते. त्यामुळेच कोकण सुजलाम, सुफलाम होऊ शकेल. -इक्बाल शर्फ मुकादम 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

विनोदाचे अचूक टायमिंग साधणारा सर्वांचा लाडका  ‘लक्ष्या '