ऐरोलीमध्ये सर्वांनी साथ सोडली, आता बेलापूरवर डोळा

वाशी : ऐरोलीमध्ये यांना सगळे सोडून गेले म्हणून आता बेलापूर मतदारसंघावर यांचा डोळा आहे. पण, लोकांना सगळे समजते, कोण मेहनत करते आणि कोण आयत्या जागेवर येते. सदर बाब मतदार जाणतात, असा टोला आ. मंदाताई म्हात्रे यांनी आ. गणेश नाईक यांना लगावला आहे.

नवी मुंबई महापालिकामार्फत बेलापूरमध्ये सुपर स्पेशलिटी रुग्णालयासाठी बांधण्यात येत आहे. या कामात नाईक समर्थकांनी अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप या आधी आ. मंदाताई म्हात्रे यांनी केला होता. मात्र, या सर्वांवर मात करत रुग्णालयाचे काम मार्गी लागले असून याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत आ. म्हात्रे यांनी यावेळी नाईकांचा समाचार घ्ोतला.

स्वतः काम करायचे नाही आणि मी काम करायला गेले की त्यात खो घालायचा. महापालिकेने निधी दिला नाही म्हणतात. मग, तुम्ही काय करत होतात. तुम्ही तर पालकमंत्री होतात. तुम्हाला का निधी आणता आला नाही? असा सवाल त्यांनी विचारला. रुग्णालयाचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळून स्थानिकांना रोजगार मिळेल. या कामात आडकाठी आणू नका. अन्यथा मग भांडाफोड करावा लागेल. कोव्हीड काळातील फाईल माझ्याकडे आहेत. किती लॅबमध्ये कुठे कुठे गेले? सगळ्या फाईल आहेत. काढू का कोव्हीड काळातली एक तरी फाईल? कोव्हीडमध्ये कोणी पैसे लुटले? असे आ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.  

नेमव्ोÀ राजकारण काय?
गेल्या काही महिन्यांपासून भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक बेलापूर मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. मंदाताई म्हात्रे यांच्या मतदारसंघात त्यांनी संपर्क कार्यालय उघडले आहे. बेलापूर मधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नाईक यांची तयारी सुरु झाल्याने आ. मंदाताई म्हात्रे सावध झाल्या आहेत. त्यामुळे एकाच पक्षात असलेल्या नाईक आणि म्हात्रे यांच्यात ठिणग्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई भाजपमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसू लागले आहे.

गणेश नाईक ऐरोलीचे आमदार आहेत. तर मंदाताई म्हात्रे बेलापूरच्या आमदार आहेत. गणेश नाईक यांना ऐरोलीतून पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी हवी आहे. पण, ऐरोली मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. इथून शिंदे सेनेच्या विजय चौगुले यांचे तिकीट  जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे नाईक यांना मतदारसंघावर पाणी सोडावे लागू शकत. शिंदे आणि नाईक यांचे विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी ठाणेची जागा शिंदे सेनेला सुटल्यान नाईक नाराज झाले. त्यांनी विषय राजीनाम्यापर्यंत नेल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते.

ऐरोलीची जागा शिंदे सेनेला सुटण्याची शक्यता असल्याने नाईक यांनी मंदाताई म्हात्रे यांच्या बेलापूर मतदारसंघात तयारी सुरु केली आहे. गणेश नाईकांसोबतच संदीप नाईक यांना देखील विधानसभेचे तिकीट हवे आहे. त्यामुळे म्हात्रे आणि नाईक यांच्यात ठिणग्या पडू लागल्या आहेत. मंदाताई म्हात्रे बेलापूरची जागा सोडण्यास तयार नाहीत. २०१४, २०१९ मध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता त्या येथून हॅटट्रीक करण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

करंजा बंदर होणार सर्वात मोठे फिशिंग हार्बर-फडणवीस