वाशीकरांना लवकरच २.२६ कोटी निधीतून बहुउद्देशीय इमारत

नवी मुंबई : ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या विकास निधीमधून नवी मुंबई मध्ये विविध नागरी विकास कामांचे भूमीपुजन आणि उद्‌घाटन धुमधडाक्यात सुरु आहेत. त्याअंतर्गत वाशी, सेवटर-१५ मधील मीनाताई ठाकरे मैदानामध्ये खुला मंच (स्टेज) तोडून त्या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. या बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपुजन २८ ऑगस्ट रोजी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत आणि नवी मुंबई महापालिका अतिरिवत आयुवत तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेविका माधवी शिंदे, रत्ना विश्वासराव, अंजली शिंदे, मुकुंद विश्वासराव, विक्रम पराजुली, विकास सोरटे, प्रमिला खडसे, मालती सोनी, राजू तिकोने, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर, ज्येष्ठ नागरिक पी. डी. चौधरी, महापालिका अधिकारी कार्यकारी अभियंता अजय संखे, विद्युत संजीव पाटील, उपअभियंता संतोष चौधरी, तानाजी शिंदे, विभाग अधिकारी सागर मोरे तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिका निधी आणि आमदार विकास निधी अंतर्गत २.२६ कोटी रुपये खर्च करुन वाशी, सेवटर-१५ येथे नागरिकांकरिता बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. प्रस्तावित एकमजली इमारतीत तळमजल्यावर बहुउद्देशीय व्यासपीठ,  २ चेंगिंग रुम, स्टोअर रुम आणि शौचालय अशी सुविधा असणार आहे. तसेच येथील नागरिकांची गेल्या काही महिन्यापासून सदरचा खुला मंच असल्याने परिसरातील वसाहतीमधील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्याकरिता लागणारे मंडप भाडे आणि इतर कार्यक्रमाकरिता लागणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे नागरिकांना कमी खर्चात सोयी-सुविधा मिळाव्यात या हेतुने मीनाताई ठाकरे मैदानामध्ये बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध प्रकारचे कार्यक्रम करणे शवय होणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मोरबे धरण जलपूजन वादात