भाजपा कार्यकर्त्यांद्वारे महिलांच्या सुरक्षिततेची, सबलीकरणाची प्रतिज्ञा

नवी मुंबई : ‘नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता पार्टी'च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी २४ ऑगस्ट रोजी महिला-मुली यांच्या सुरक्षिततेची, सक्षमीकरणाची आणि सबलीकरणाची शपथ घेतानाच मुली-महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीचा मूक निषेध केला.

नवी मुंबई जिल्हा भाजपाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ येथे २४ ऑगस्ट रोजी सकाळी काळ्याफिती लावून  भाजपा कार्यकर्त्यांनी बदलापूर, नवी मुंबई आणि राज्यातील अन्य ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध केला.  यावेळी संदीप नाईक यांनी  उपस्थित भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महिलांच्या सुरक्षिततेची, सक्षमीकरणाची आणि सबलीकरणाची  शपथ दिली.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आपण निषेध करतो.  मुली-महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना भविष्यात घडू नयेत, याकरिता समाजामध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, सबलीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी  सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी  केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्तरावर असलेल्या  अनेक चांगल्या योजना राबविल्या गेल्या पाहिजेत. महिला सन्मान, सबलीकरण, सक्षमीकरण आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वजण कटिबध्द आहोत, असे यावेळी संदीप नाईक यांनी नमूद केले.

मूक निषेध आंदोलन मध्ये नवी मुंबई जिल्हा भाजपा उपाध्यक्ष रवींद्र इथापे, दशरथ भगत, महामंत्री नेत्रा शिर्के, सुरज पाटील, नवी मुंबई जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार, ‘भारतीय जनता युवा मोर्चा'चे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अमित मेढकर, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष राजेश राय, विजय वाळुंज, सुरेश शिंदे, शितल भोईर, कल्पना छत्रे यांच्यासह भाजपा महिला, युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

महिलांवर अत्याचार करणारी विकृत मनोवृत्ती ठेचून काढण्यासाठी समाजप्रबोधनाची गरज आहे, असे यावेळी माधुरी सुतार यांनी स्पष्ट केले. पुरुषी विचार बदलून प्रत्येकाने माता-भगिनींच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी अमित मेढकर यांनी केले. प्रत्येकाने आपल्या घरापासून महिला सुरक्षिततेचा संकल्प करुन समाजात देखील आपली जबाबदारी पार पाडावी, असे सुरज पाटील यावळी म्हणाले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 विधानसभा निवडणुकीतही ‘मविआ'कडून अपप्रचाराची शक्यता - ना. रवींद्र चव्हाण