स्थानिकांना ८०% नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासन नियमाप्रमाणे ८० % रोजगार हा स्थानिकांना मिळालाच पाहिजे, ह्यासाठी शहर अध्यक्ष. गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ MIDC मधील कंपन्यांना भेट देऊन निवेदन दिले.
राज्य सरकारचा ८०% स्थानिकांना नोकऱ्या द्या असा शासन निर्णय असताना देखील बहुतांश कंपन्या याकडे कानाडोळा करत आहेत. राज्य सरकारचा उद्योग विभाग तसेच कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभाग सुद्धा या बाबत ढिम्म आहे. या बाबत नवी मुंबईतील कंपन्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक विविध कंपन्यांना या बाबत निवेदन देत आहेत. तसेच त्यांना विनंती करत आहेत की शासन निर्णयाची अंमलबजावणी करून स्थानिकांना ८०% हून जास्त नोकऱ्या उपलब्ध करून द्यावा.
मनसेच्या या शिष्टमंडळात मनसे शहर सचिव सचिन कदम, मनसे रोजगार विभाग शहर संघटक संप्रीत तूर्मेकर, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, उमेश गायकवाड, निखिल गावडे, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, शाखा अध्यक्ष प्रणित डोंगरे आणि इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.