बदलापूरमध्ये २ मुलींवर अत्याचार
नवी मुंबई : बदलापूरमध्ये २ शाळकरी लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष'च्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २१ ऑगस्ट रोजी निदर्शने करण्यात आली. जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छेडल्या गेलेल्या या आंदोलनात शेकडा शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी ‘महायुती सरकार'च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे वाशीचा परिसर दणाणून गेला.
बदलापूर मधील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या २ अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांनी नराधमाला वाचावण्यासाठी जीवाचा आटापिटा करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परिणामी, २० ऑगस्ट रोजी बदलापूरमध्ये नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर आणि त्याला वाचवणारे शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांवर कडक कारवाई करावी यासाठी ‘शिवसेना'च्या वतीने २१ आगस्ट रोजी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, ‘राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी, प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, सुमित्र कडू, शहरप्रमुख काशिनाथ पवार, प्रविण म्हात्रे, महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर, उपशहरप्रमुख तानाजी जाधव, समीर बागवान, विशाल ससाणे, रतन मांडवे, शिवाजी महाडिक, शहर संघटक कोमल वास्कर, निशा पवार, उषा रेनके, स्मिता धमामे, विशाल ससाणे, विशाल विचारे, निखिल मांडवे, विजय चांदोरकर, जितेंद्र कांबळी, संदीप पवार, राकेश मोरे, सलुजा सुतार, मिट्टू सिंग, अजय पवार, सुनील गव्हाणे, दिपक परब, महेश कोटीवाले, सिध्दाराम शिलवंत, एकनाथ दुखंडे, निल घागरे, आदि सहभागी झाले होते.