सिडको तर्फे गव्हाण-कोपर रस्त्याची तातडीने दुरुस्ती!
पनवेल : रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या प्रयत्नांने भयानक दुरवस्था झालेल्या गव्हाण-कोपर रस्त्याची तातडीने दुरुस्ती सिडको तर्फे करण्यात आल्याने या रस्त्यावरुन ये-जा करण्याऱ्या ग्रामस्थ आणि दुचाकीस्वारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
गव्हाण-कोपर रस्त्याची भयानक दुरावस्था झाली होती. ग्रामस्थांना रस्त्यावरून चालणे तसेच दुचाकी चालविणे जिकरीचे झाले होते. या रस्त्यावर बरेच दुचाकीस्वार स्लीप होवून पडत होते. याची दखल रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी घेत सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने गव्हाण-कोपर रस्त्याची दुरुस्ती करावयास भाग पाडल्यानंतर या रस्त्याची सिडको द्वारे दुरुस्ती करण्यात आली. महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याने तातडीने झालेल्या गव्हाण-कोपर रस्त्याच्या दुरुस्तीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, येत्या दिपावली पूर्वी गव्हाण-कोपर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी महेंद्र घरत यांना दिले आहे.