थेट मंत्रालयातून

भाजपच्या सत्तेचे लाचार भोई !

परळाीचे मुंडे स्वतःला पक्क्या गुरूचे चेले समजू लागले होते. रुपालाी चाकणकरांच्या शब्दाला पक्षातून फुटून बाहेर पडल्यावर धार चढलाी आहे. भुजबळ तर नटसम्राट. काहाीहाी फेकलं तराी लोकं मानताील, असा त्यांचा समज झाला आहे. आपल्यावरच्या कारवाया रोखणं आणि आपसूक सत्तेत जाऊन बसणं इतकाच या मंडळींचा कार्यक्रम आहे. पडत्या काळात सुनिल तटकरे यांनाी अंतुलेंच्या पाठाीत वार केले होते. पवारांनाी तटकरेंना आसरा दिला. त्यांनाी बंधू अनाील यांना विधान परिषदेवर, पुतण्या अवधूत याला विधानसभेवर आणि मुलगाी आदिताीला मंत्राी करून टाकलं.

महाराष्ट्राताील सत्तेच्या पिपासूंचा नंगानाच गेल्या रविवाराी साऱ्या जगाने अनुभवला. गेल्या वर्षी याच काळात हा नंगानाच गोहाटाीपासून गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून मुंबईपर्यंत निर्लज्जपणे सुरू होता, तोहाी याचि देहाी याचि डोळा अनुभवला. माणूस नावाचा प्राणाी किताी निष्ठूर असतो, तो कसाहाी विकला जाऊ शकतो आणि विकला जाऊनहाी मालकावर कसा दुगाण्या झाडतो याचं उदाहरण देशभरातल्या जनतेला मिळालं. या नंगानाचाचे खलनायक होते अर्थातच देवेंद्र फडणवाीस.

फडणवाीसांनाी राज्याच्या राजकरणाचा बाजार करण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो आहे. काहाीहाी करा सत्ता ताब्यात घ्या, या त्यांच्यातल्या हवरटपणाने राज्याच्या राजकाीय संस्कृताीला काळिमा फासला आहे. सत्तेसाठाी आजवर माणसं फोडलाी जायचाी. आता थेट पक्षच फोडायचा आणि सत्ता काबाीज करायचाी पध्दत फडणवाीसांनाी अंगिकारलाी आहे. आधाी शिवसेना फोडलाी. आता राष्ट्रवादाीच्या मालकाीवर दावा सुरू आहे. भाजपच्या ढासळत्या राज्य सत्तेचाी जुळवाजुळव दुसऱ्या पक्षांचाी घरं फोडून होईल, असा भाबडा विश्वास फडणवाीसांचा आहे. 2024 ला केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठाी देशाताील दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यात फडणवाीसांनाी लुटारूगिराीचा मार्ग अनुसरला आहे. गेल्या काहाी काळाताील राज्याताील राजकाीय चित्र लक्षात घ्ोता महाराष्ट्राताील राजकारणाच्या दुर्देवाचे फेरे फडणवाीसांच्या नावे नोंदले जाताील, यात आता संदेह नाहाी. आजवर महाराष्ट्र हे पुरोगामाी राज्य म्हणून गणलं जात होतं. ते इतिहासजमा झालं.  कधाीकाळाी ते पुरोगामाी होतं, असं म्हणायचाी वेळ आलाीय. आता ते इतिहासजमा झालं आहे. राजकरणाचा इतका विचका देशात कधाीच झाला नव्हता. महाराष्ट्राचं हे पुरोगामित्व या एका माणसाने विक्राीला काढलंय आणि त्याला कोणाीहाी आवरू शकत नाहाी. कारण तो निष्ठूर आणि कपटाी आहे. तो कशाचाहाी आसरा घ्ोऊ शकतो आणि समोरच्याला आत टाकू शकतो.

शिवसेनेचे आमदार फडणवाीसांच्या सत्तेला भाळले तेव्हा त्यांनाी अनेक निमित्त केलाी. कोण अजित पवारांच्या नावे निधाीचं निमित्त करत होतं, तर कोणाी उध्दव ठाकरे घरात बसल्याचं कारण सांगत होतं. काहाी हिंदुत्वाच्या नावाने फुशारक्या मारत होते. तर काहाीजण कामच होत नसल्याचाी नकारघंटा वाजवत होते. आता राष्ट्रवादाीच्या नेत्यांनाीहाी निमित्ताला कारणं शोधलाीच आहेत. शिंदेंचे आमदार तसे नवखे होते. हे राजकारण त्यांच्या अंगवळणाी पडत नव्हतं. ते पडद्याआडचे कलाकार असल्याने स्क्राीप्ट येईल ताी वाचण्याचं काम ते करत होते. राष्ट्रवादाीच्या या म्होरक्यांचं तसं नव्हतं. हे म्होरके पुरते बनेल आणि पोहोचलेले आहेत. ते होत्याचं नव्हतं सहज करू शकतात. आपल्या बंडाला ते कोणताीहाी कारणं देऊ शकतात. त्यांना म्हणे वि्ीलाला भेटू दिलं जात नव्हतं. वि्ीलाचा भोवताल बडव्यांनाी व्यापल्याचाी त्यांचाी तक्रार होताी. काहाीजण पवारांनाी सल्ले देण्यापुरतं उरावं असं म्हणत होते. सत्तेत जाण्याचे मार्ग म्हणे पवार यांनाी रोखून धरले होते. परळाीचे मुंडे तर स्वतःला पक्क्या गुरूचे चेले समजू लागले होते. रुपालाी चाकणकरांच्या शब्दाला पक्षातून फुटून बाहेर पडल्यावर धार चढलाी आहे. भुजबळ तर नटसम्राट. काहाीहाी फेकलं तराी लोकं मानताील, असा त्यांचा समज झाला आहे. सारं गंगेला मिळालं असताना ते वि्ीलाचा धावा करू लागले आहेत. आपल्यावरच्या कारवाया रोखणं आणि आपसूक सत्तेत जाऊन बसणं इतकाच या मंडळींचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम यथायोग्य पार पाडावा म्हणून हाी माणसं आज उघड खोटं बोलत आहेत.

छगन भुजबळांचाी रवानगाी ज्या भाजपने तुरुंगात केलाी त्या भाजपच्या ते आडोशालाहाी जाणार नाहाीत, असं वाटत असताना ते आता भाजपऐवजाी पवारांनाच प्रश्न विचारत आहेत. पवार माझे वि्ील आहेत, असं सांगणाऱ्या या भुजबळांमागे पवार खरोखरच वि्ीलाच्या रुपाने उभे होते. उध्दव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये कोणाला पाठवावं यावरून सुरू असलेला खल पवारांनाी एका शब्दात निकालात काढला. तुरुंगात जाऊन आलेल्या भुजबळांच्या नावे अजित पवारांपासून तटकरे, पटेलांचाी फुलाी होताी. तुरुंगातून बाहेर आलेल्या व्यक्ताीला मंत्रिपदाी बसवल्यास महाविकास आघाडाीचाी सुरुवाताीलाच नकारात्मक होईल, अशाी या मंडळींचाी तक्रार होताी. या तक्रारींकडे पार दुर्लक्ष करत पवारांनाी पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये भुजबळांचाी वर्णी लावलाी. तराीहाी वि्ील पावला नाहाी, असं भुजबळ म्हणतात याचा अर्थ काय काढावा? पक्षामध्ये आपला अपमान झाल्याचाी तक्रार भुजबळ आता करत आहेत. खरं तर भुजबळांइतकं पुनर्वसन राष्ट्रवादाीत एकाहाी व्यक्ताीचं झालं नाहाी. वयानुसार भुजबळ यांना विसराळूपणा आला असण्याचाी शक्यता नाकारता येत नाहाी.

निलाजऱ्या नेत्यांमध्ये आणखाी एका नेत्याचा समावेश आहे. हा नेता म्हणजे भंडाऱ्याचे प्रफुल्ल पटेल. या पटेलांच्या अवकाताीचाी कांँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाी एका शब्दात मोजणाी केलाी. पटेल हा अवसानघातकाी आणि पाठाीत खंजाीर खुपसणारा माणूस असल्याचं नाना म्हणाले. ते अगदाीच गैर होतं असं नाहाी, हे आता लक्षात येतं. केंद्रात ते ज्या ज्या ठिकाणाी मंत्राी होते तिथे भ्रष्ट कारभार केल्याच्या असंख्य तक्राराी भाजपने त्यांच्या विरोधात केल्या आणि लावूनहाी धरल्या. विमानोड्डाण मंत्राी असताना त्यांच्या नावाने भ्रष्टाचाराचाी जंत्राी भाजपने जमवलाी होताीच; पण वरळाीच्या साी.जे.हाऊसमधल्या चार मजल्यांच्या खरेदाीच्या प्रकरणात भाजपने त्यांचाी पिसं उपटलाी होताी. या मजल्यांवर ईडाीने टाच आणलाी आणि त्याचा जाब देण्याचं फर्मान पटेलांवर बजावलं. दाऊदचा साथाीदार असलेल्या इक्बाल मिर्चीच्या पत्नाीबरोबराील आर्थिक व्यवहाराताील चौकशाीचे फेरे भाजपने पटेलांच्या मागे लावले. जागतिक फुटबॉल महासंघाचा अध्यक्ष या नात्याने क्रिडा संहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका पटेल यांच्यावर ठेवला होता. इंडियन एअरलाईन्सचे माजाी अध्यक्ष सुनाील अरोरा यांनाी एअर इंडियाच्या बरबादाीस प्रफुल्ल पटेल कारण असल्याचा गंभाीर आरोप केला होता. पटेल हे विमानोड्डाण मंत्राी असताना जेट विमानं खराीदण्याचा निर्णय हा केवळ कमाईच्या उद्देशाने आणि एका कंपनाीच्या फायद्यासाठाी त्यांनाी घ्ोतल्याचा गंभाीर आरोप अरोरा यांनाी केला होता. या प्रकरणाताील भ्रष्टाचाराचे धागेदोरे भाजपने ईडाीकडे पोहोचवले. ते पटेलांच्या भोवताी पिंगा घालत आहेत.  

पवारांचा हात धरून आपल्या मुलाीचा राजकाीय विकास करणाऱ्या सुनाील तटकरेंबाबत काय बोलावं तेच कळत नाहाी. ज्यांना ते गुरू समजतात त्यांच्याच पाठाीत तटकरे खंजाीर खुपसतात, हा त्यांचा इतिहास आहे. पडत्या काळात त्यांनाी अंतुलेंच्या पाठाीत वार केले होते. कुठलाहाी विचार न करता पवारांनाी त्यांना आसरा दिला. त्यांनाी राष्ट्रवादाीला आपला रखेल पक्ष बनवून टाकलं. त्यांनाी बंधू अनाील यांना विधान परिषदेवर, पुतण्या अवधूत याला विधानसभेवर आणि मुलगाी आदिताीला मंत्राी करून टाकलं. ज्या मुलाीला राजकारणातला ओ काी ठो कळत नव्हतं तिला राज्यमंत्राी करून घ्ोतलं. तिथे त्यांना प्रशांत पाटाील, राजवाडे, निकम दिसले नाहाीत. रायगड जिल्ह्याताील कोंडाणे आणि बाळगंगा या प्रकल्पांच्या उभारणाीकामाी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तटकरे यांच्यावर आरोपपत्रहाी दाखल केलं, तेहाी भाजपच्या आग्रहाखातर. अटाी आणि शर्तींना गुंडाळून बोगस निविदाकार उभे करून तटकरे यांनाी सुमारे ८0 कोटाी रुपयांचाी कामं चक्क ६14 कोटाीला बहाल केल्याचा गंभाीर आरोप तेव्हा किराीट सोमय्या यांनाी केला होता. या प्रकरणाचाीहाी ईडाीकरवाी चौकशाी सुरू आहे. सहा अधिकाऱ्यांविरोधाी गुन्हे दाखल झाले तेव्हापासून तटकरेंचा कल भाजप प्रवेशाचा होता.

७0 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचाी टांगताी तलवार अजित पवार आणि सुनाील तटकरे यांच्यावर होताीच. याच कारणास्तव मार्च 2022 मध्ये ईडाीने अजित पवार यांच्या घरावर छापेमाराी केलाी होताी. काहाी संपत्ताीवर टाचहाी आणण्यात आलाी होताी. पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावरहाी जप्ताीचाी कारवाई करण्यात आलाी. या साऱ्या कारवाया हाी अजित पवारांसाठाी भाजपचाी देण होताी.  पुढे विदर्भ सिंचन घोटाळ्यात ईडाीने मे 2020 मध्ये रितसर चौकशाी सुरू  केली. पार्थ पवार यांच्या कंपनीवर छापेमारी झाली. राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्यातही अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांचं नाव भाजपने गोवलं. कोल्हापुरचे हसन मुश्रिफ यांच्यावरील आरोपांसाठी त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर भाजपने ईडीची छापेमारी करायला लावली. कागलचा सर सेनापती साखर कारखाना, अप्पासाहेब नलावडे या गडहिंग्लज येथील सारखर कारखान्यातील कथित घोटाळ्याच्या चौकशीत ईडीने मुश्रिफांच्या घरावर, कार्यालय आणि कारखान्यांवर धाडी टाकून त्यांना हैराण करून सोडलं. भाजपचे सोमय्या यामागे होते. या सर्वांवरील आरोप खरे की खोटे हे आरोप करणारे भाजपचे नेतेच सांगू शकतील. पण त्याआधीच त्यांनी आपलं इमान विकलं. ते सगळे आरोप करणाऱ्या भाजपच्या आणि फडणवीसांच्या वळचळणीला जाऊन शरद पवार यांनाच दोष देत असतील तर त्यांना आपला चेहरा आरशात पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. आता पवारांवर आरोप करून त्यांना स्वतःला सिध्द करून दाखवता येणार नाही. भाजपच्या सत्तेचे लाचार भोई गणावं, इतका दोष त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात केला आहे.    
-प्रविण पुरो, ज्येष्ठ पत्रकार. 

Read Previous

शिवसेना फुटीमागचे कारस्थानी !