दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिट व झारखंड ए. टी.एसची संयुक्त कारवाई  

झारखंड येथील मोस्ट वान्टेड गॅगस्टर अमन सुशील श्रीवास्तव वाशीमध्ये जेरबंद  

नवी मुंबई : खंडणी, खुन, आर्म एक्ट व यु.ए.पी.ए. यासारख्या अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला व मागील 9 वर्षा पासुन फरार असलेला झारखंड येथील मोस्ट वान्टेड गॅगस्टर अमन सुशील श्रीवास्तव उर्फ रोहन विनोद कुमार (31) याला दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिटने व झारखंड ए. टी. एसच्या पथकाने सोमवारी संयुक्त कारवाई करुन वाशी रेल्वे स्टेशन येथून जेरबंद केले.  

गॅगस्टर अमन सुशील श्रीवास्तव याच्यावर झारखंड राज्यात खंडणी, खुन, आर्म एक्ट व यु.ए.पी.ए. कायदयान्वये 40 गुन्हे दाखल असुन या गुन्हयामध्ये तो सन 2015 पासुन फरार होता. झारखंड ए. टी. एसकडुन मागील 9 वर्षा पासुन त्याचा शोध घेण्यात येत होता. आरोपी अमन श्रीवास्तव हा आपले अस्तित्व लपविण्यासाठी भारत देशातील विविध राज्यामध्ये फिरत होता. सदर आरोपी हा नवी मुंबईत वाशीमध्ये असल्याची माहिती झारखंड ए.टी.एसला मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला याबाबतची माहिती दिली होती.  
सदर माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटचे अधिकारी व अंमलदार तसेच झारखंड ए.टी.एसच्या पथकाने सोमवारी वाशी रेल्वे स्टेशन जवळ सापळा लावुन गॅगस्टर अमन सुशील श्रीवास्तव याला ताब्यात घेवुन अटक केली. सदरची कारवाई राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस महासंचालक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, व पोलीस अधीक्षक (गुफ्तवार्त) यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे 22 कारटेप हस्तगत