खारघरमधुन ई-सिगारेटचा साठा जप्त 

खारघरमधुन 6 लाख 44 हजारांचा ई-सिगारेटचा साठा जप्त 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी खारघर सेक्टर-4 मधिल लक्ष्मण व्हिला या इमारतीवर छापा मारुन सदर इमारतीतील गाळ्यामध्ये विक्री करण्यासाठी लपवून ठेवण्यात आलेला सुमारे 6 लाख 44 हजार रुपये किंमतीचा ई सिगारेटचा साठा जफ्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ई-सिगारेटचा साठा करुन ठेवणा-या अर्जुन भिमा राठोड (27) याला अटक केली आहे.  

खारघर सेक्टर-4 मधील श्री लक्ष्मण व्हिला इमारतीतील श्री महावीर एक्स्पेस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या गाळ्यांमध्ये ई-सिगारेटचा साठा करुन ठेवण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.सय्यद यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याच्या सुचना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कुलदिप मोरे व त्यांच्या पथकाने बुधवार दि. 3 मे रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास खारघर मधील श्री महावीर एक्स्पेस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या गाळ्यावर छापा टाकला.  
 
त्यानंतर पोलिसांनी सदर गाळ्याची पहाणी केली असता सदर गाळ्यामध्ये बेकायदेशीररीत्या तब्बल 6 लाख 44 हजार रुपये किंमतीच्या विविध फ्लेव्हरच्या ई-सिगारेटचा साठा आढळुन आला. सदर ई सिगारेटचा साठा ग्राहकांना विक्री करण्यासाठी ठेवण्यात आल्याचे चौकशीत आढळुन आल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर ई सिगारेटचा साठा जफ्त केला. त्यानंतर ई सिगारेटाचा साठा करुन ठेवणा-या अर्जुन राठोड याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात द प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ऍक्ट 2019 चे कलम 4 (1) 7 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.  
Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मुख्य सचिव, शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, खारघर पोलीस, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना प्रतिवादी