वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कारवाई    

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या ६२ हजार ५९९ वाहन चालकांवर कारवाई    

नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी एप्रिल महिन्यात विशेष मोहीम राबवून वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या एकुण ६२ हजार ५९९ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे मद्य प्राशन करुन वाहन चालविणा-या ९१ वाहन चालकांवर ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई  केली आहे. ही कारवाई नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील १६ वाहतूक शाखांकडून करण्यात आली.  

अनेक वाहन चालक हे बेशिस्तपणे तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवत असतात. तर काही वाहन चालक हे दारु पिऊन वाहन चालवत असतात. अशा वाहन चालकांमुळे अपघात होऊन त्यात निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे वाहन चालकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये तसेच त्यांनी वाहतुक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतुक विभागाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येते. मात्र त्यानंतरही मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार घडत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतुक पोलिसांकडुन अशा वाहन चालकांवर नियमित कारवाई केली जाते.  

गत एप्रिल महिन्यात नवी मुंबई वाहतुक विभागाअंतर्गत असलेल्या १६ वाहतूक शाखांनी आपल्या हद्दीत विशेष मोहिम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया ६२ हजार ५९९ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. यात अतिवेगाने वाहन चालविणे ६८४३, विना हेल्मेट - १२४६६,  विना सिटबेल्ट ७८९७, सिग्नल तोडणे - १८९८, धोकादायक वाहन चालविणे १२८, दारु पिवुन वाहन चालविणे ९१, मोबाईल संभाषण - १०२१ इत्यादी कारवायांचा समावेश आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालविणा-या चालकांविरोधात यापुढील काळात देखील कारवाई सुरु राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहने चालवावीत असे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

खारघरमधुन ई-सिगारेटचा साठा जप्त