महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर वाहन चालकांचे रस्ता सुरक्षेसंबधी प्रबोधन  

महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांचे रस्ता सुरक्षेसंबधी प्रबोधन  

नवी मुंबई : मुंबई -पुणे महामार्गावर होणारे अपघात त्याची कारणे व परिणाम तसेच सदर अपघात कमी करण्यासाठी घ्यायची दक्षता व करावयाच्या उपाययोजना तसेच गोल्डन अवर्सचे महत्व या विषयावर रस्ता सुरक्षा जनजागृती प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  

अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड विभाग संदीप भागडीकर, महामार्ग पोलीस पनवेल विभागाच्या गौरी मोरे यांच्या मागदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे पोलीस उप निरीक्षक गणेश बुरकुल यांच्यासह वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पुणे लेन अमेटी युनिवर्सिटी समोरील पार्किंगमध्ये शनिवारी महामार्गावर रस्ता सुरक्षा जनजागती या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  

यावेळी उपस्थित असलेल्या वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमाबाबत मार्गदर्शन करुन महामार्गावर दिलेल्या वाहतूक चिन्ह व सूचनांना अनुसरुन वाहन चालवणे व वाहतुकीचे नियमांचे पालन करणे, वाहन धारक चालक यांनी वाहन चालविताना लायसन्स व वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगावी, जड वाहने महामार्गाच्या तिसऱया लेनने डाव्या बाजुने चालवून लेनचे नियम पाळावे, मार्गीका बदलताना व ओव्हरटेक करताना इंडिकेटरचा उपयोग करावा, अति वेगाने किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, नशा करुन वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, रात्रीच्यावेळी वाहन चालवितांना पुरेशी झोप घेऊनच वाहन चालवावे.

यासह वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त मालाची अथवा प्रवाशांची वाहतूक करु नये, केमिकल युक्त धोकादायक हानिकारक पदार्थांची वाहतूक करताना, प्रशिक्षित चालकांचीच नेमणूक करावी, वाहनाचा उपयोग करण्यापूर्वी त्याची तांत्रिक स्थिती पाहूनच उपयोग करावा, उदा. टायर मधील हवा, पुरेसे इंधन, इंजिनची स्थिती, इंडिकेटर रिफ्लेक्टर इत्यादी, महामार्गावर धोकादायक स्थितीत वाहने उभी करु नये परंतु एखाद्या वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यास 9822498224 या मोबाईल क्रमांकावर कॉल करुन मदत मागवून वाहनाच्या पाठीमागे कोण लावून अथवा बॅरीकेटिंग करुन घ्यावी.  

अपघातामधील व्यक्तींना तात्काळ योग्य ती मदत पुरवून झालेल्या अपघाताबाबत 9833498334 / 100 / 112 /108/ 8652085500 या क्रमांकावर कॉल करुन घटनेबाबत माहिती द्यावी, याबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच मृत्युजंय दुत व स्व.बाळासाहेब ठाकरे विमा अपघाताबाबत माहीती देऊन अपघातासमयी जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आलेले आहे. यावेळी महामार्गावर वाहने चालवताना पालन करावयाच्या नियमांचे माहितीपत्रके उपस्थितांना वाटप करण्यात आले.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऍन्ड पायाना व आँरेंज मिंट या दोन हॉटेलमध्ये बेकायदेशीरीत्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई