ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहती मधील भंगाराच्या गोदामाला आग  

पावणे औद्योगिक वसाहती मधील कलर कंपनीच्या गोदामाला आग

नवी मुंबई : पावणे औद्योगिक वसाहती मधील सी-126 व 127 या भूखंडावर असलेल्या कलर कंपनीच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही, मात्र सदर गोदामात असलेले भंगाराचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. एमआयडीसी व महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी सदरची आग 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. सदरची आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही.  

पावणे एमआयडीसीतील कलर कंपनीचे तेथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या खालीच गोदाम असून या गोदामाला शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. सदर गोदामात मोठÎा प्रमाणात केमिकलचे रिकामे ड्रम व इतर भंगार साहित्य ठेवण्यात आल्याने सदरची आग झपाटÎाने सर्वत्र पसरली. या आगीची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने त्याठिकाणी महापालिकेच्या वाशी, कोपरखैरणे, नेरुळ येथील अग्निशमन दलाच्या जवानांना त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दल जवानांनी 3 तासापेक्षा अधिक काळ अथक प्रयत्न करुन येथील आग आटोक्यात आणली. त्यानंतर जवानांकडुन त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत कुलींगचे काम सुरु होते. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या आगीची नोंद घेऊन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सराईत वाहन चोरटा जेरबंद