बदलीच्या प्रकरणात मनपा लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

5 लाख रुपयांची लाच घेताना महापालिकेचा लिपीक ऍन्टी करफ्शनच्या जाळ्यात  

नवी मुंबई : महापालिकेत झालेली अंतर्गत बदली पूर्ववत करण्यासाठी तसेच वार्षिक गोपनीय शेरे लवकरात लवकर पाठविण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती रक्कम स्विकारणाऱया कोपरखैरणे येथील परिमंडळ-2 च्या उपआयुक्तांच्या कार्यालयातील लिपीक दिनेश सोनवणे याला नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक युनिटने शुक्रवारी सायंकाळी सापळा लावुन अटक केली. सोनवणे याने वरिष्ठांच्या नावाने तक्रारदाराकडुन 5 लाख रुपये लाच घेतल्याने हा वरिष्ठ अधिकारी कोण? याची चर्चा महापालिका वर्तूळात जोरदार सुरु आहे.  

या प्रकरणातील तक्रारदार रितेश पुरव हा नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ विभाग कार्यालयात अतिक्रमण विभागात ज्युनियर इंजिनियर म्हणुन कार्यरत असून परिमंडळ-2 च्या उपआयुक्त अमिरीश पटनीगीरे यांनी काही दिवसांपुर्वीच पुरव याची महापालिकेच्या    मुख्यालयात बदली केली होती. हि बदली पुर्ववत करण्यासाठी रितेश पुरव याने प्रयत्न सुरु केले होते. परिमंडळ-2 चे उपआयुक्त अमरिश पटनीगीरे यांचे कोपरखैरणे विभाग कार्यालात देखील कार्यालय असुन याच कार्यालयात लिपीक दिनेश सोनवणे हा कार्यरत आहे. रितेश पुरव याने दिनेश सोनवणे याच्याकडे त्याची झालेली बदली पुर्ववत करण्यासाठी संपर्क साधला होता.  

त्यानंतर सोनवणे याने वरिष्ठांच्या नावाने रितेश पुरव याच्याकडे 5 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर रितेश पुरव याने नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस उप अधिक्षक शिवराज म्हेत्रे व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी कोपरखैरणे येथील उपआयुक्त परिमंडळ-2 च्या कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी लिपीक दिनेश सोनवणे याने रितेश पुरव याच्याकडुन 5 लाख रुपयांची लाच स्विकारल्यानंतर लाच लुचतपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले.  त्यानंतर त्याच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहती मधील भंगाराच्या गोदामाला आग