पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचा-यांचे अभिनंदन

नवी मुंबई पोलीस दलातील 14 पोलीस अधिकारी कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर

नवी मुंबई : महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचा-यांना तसेच उल्लेखनीय प्रशंसनीय कार्य करणा-या पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक आणि पोलीस शौर्य पदकासह पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने सन 2022 या वर्षातील उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल 800 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांना पोलीस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) जाहिर झाले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 14 पोलीस अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.  

पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर झालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक संजय नाळे, महेश पाटील, संजय चव्हाण, प्रकाश मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश खांडेकर, प्रदीप वाघ, अविनाश तांबे, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बने, सहाय्यक पोलिस हवालदार राजेंद्र भारमळ, तसेच पोलिस हवालदार जगदीश पाटील, महेश वायकर, विजय पाटील, लक्ष्मण पवार, भानुदास मोठे यांचा समावेश आहे. या सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर झालेल्या या पोलीस अधिकारी कर्मचा-यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.  

दरम्यान, येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कळंबोली येथे पोलीस मुख्यालय येथे होणाऱया पथसंचालनावेळी या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मार्केट साठी राखीव भूखंडावर भूमाफियांनी उभारले ६ मजली इमले