‘तळोजा मध्यवर्ती कारागृह'वर आता ‘ड्रोन'ची नजर

महाराष्ट्र राज्यातील कारागृहांवर आता ‘ड्रोन'ची नजर

खारघर ः महाराष्ट्र राज्यातील कारागृहांवर आता ‘ड्रोन'ची नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले जाणार आहे. यामध्ये तळोजा कारागृहाचा समावेश आहे.

तळोजा कारागृह नेहमीच कैद्यांच्या सुरक्षेवरुन चर्चेत असते. २४०० कैद्यांची क्षमता असलेल्या तळोजा कारागृहात ३ हजार पेक्षा जास्त कैदी आहेत. क्षमते पेक्षा कैद्यांची क्षमता जास्त असल्यामुळे कैद्यांमधील वाद, भांडणे, कैद्यांची आत्महत्या नेहमीच याठिकाणचा चर्चेचा विषय असल्याने ड्रोन कॅमेरा चित्रित होणार असल्यामुळे सुरक्षेबाबत अधिक माहिती गृहमंत्रालयाला मिळणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर तळोजासह येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, ठाणे, अमरावती, नागपूर, कल्याण आणि चंद्रपूर याठिकाणी ड्रोन पाहणी सुरु करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

कारागृह सुरक्षा बळकटीकरण करण्यासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार १२ ड्रोन विविध कारागृहातील बारीक गोष्टींच्या हालचाली टिपणार आहेत. संबंधित ड्रोनद्वारे रात्रीही चित्रीकरण करण्यात येणार आहे. विशेषतः कारागृहात होणाऱ्या घटना आणि कैद्यांची अपडेट मिळण्यास ड्रोनद्वारे मदत होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने र्निगमित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारनेही तातडीने ड्रोन टेहळणीसाठी प्राधान्य दिले आहे. उत्तर प्रदेश राज्याने देशात प्रथम कारागृह सुरक्षा बळकटीकरणासाठी ड्रोन  वापर सुरु केला. महाराष्ट्र राज्य कारागृह सुरक्षा बळकटीकरणासाठी ड्रोन वापरणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य  बनले आहे.राज्यातील कारागृहासह बंदिवानांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता ड्रोनद्वारे हालचाली टिपण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर ८ मध्यवर्ती, २ जिल्हा कारागृह वर आणि २ खुले कारागृहवर ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचा-यांचे अभिनंदन