वाशी गावातून गुटख्याचा साठा बाळगणारा व्यक्ती अटकेत

गुटख्याचा साठा बाळगणारा व्यक्ती अटकेत

 नवी मुंबई : वाशी पोलिसांनी वाशी गावातील एका घरावर छापा मारुन सुमारे 33 हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जफ्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा करुन ठेवणा-या रामशिश लालचंद चव्हाण (33) याला अटक केली आहे. सदर गुटख्याचा साठा त्याने कुठून आणला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
वाशी गावात राहणारा पान टपरी चालकाने आपल्या घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची व तो इतर पान टपरी चालकांना छुफ्या पद्धतीने गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर व त्यांच्या पथकाने गत बुधवारी दुपारी वाशी गावातील रामशिश चव्हाण याच्या घरावर छापा मारला.

यावेळी पोलिसांनी चव्हाण याच्या घरामध्ये असलेल्या पिशव्यांबाबत चौकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.  त्यामुळे पोलिसांनी सदर घरातील पिशव्यांची तपासणी केली असता, त्यात सुमारे 33 हजार रुपये किंमतीचे विमल पानमसाला, राजश्री, राजनिवास, मज्जा, रजनीगंधा असे विविध सुगंधीत प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ व त्यात मिक्स करण्याची तंबाखुचे पाकीटे असल्याचे आढळुन आले. त्यामुळे वाशी पोलिसांनी सदर गुटख्याचा साठा जफ्त करुन रामशिश चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. त्याने सदर गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ कुठून आणले व तो कुणा कुणाला ते विक्री करत होता, याचा पोलिसांकडुन तपास करण्यात येत आहे.   

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरी गाव मधील खुशबू पान शॉपवर छापा गुटख्याचा साठा जप्त