नवी मुंबई महापालिका विद्युत विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ ?

पुन्हा निखळला विजेचा नवीन खांब

नवी मुंबई ः काही दिवसांपूर्वीच नेरुळ, सेक्टर-१६ येथे नव्यानेच बसवलेला विद्युतखांब निखळून रस्त्यावर पडल्याची दुर्घटना घडली होती. भररस्त्यात खांब पडल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या एखाद्या नागरिकाच्या अंगावर पडून
किंवा वाहनावर पडून दुर्घटना घडली असती तर कोण जबाबदार होते? अशी विचारणा नेरुळवासियांनी त्यावेळी केली होती. विशेष म्हणजे सदर घटनेपासून अद्याप पर्यंत सदर ठिकाणी खांब बसविण्यात आला नसल्याचे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे नवी मुंबई उपाध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी सांगितले अशातच २१ मार्च रोजी पुन्हा एकदा अशीच दुर्घटना घडली. नेरुळ, सेवटर-१९ वँडर्स पार्क जवळ नव्याने बसविण्यात आलेला विजेचा खांब पडलेल्या स्थितीत
आढळला. यामध्ये कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे सर्व चिडीसुप प्रकार असल्याचे सविनय म्हात्रे यांनी सांगितले.

दरम्यान, विद्युत विभागातील अभियंते करोडो रुपयांची टेंडर याचसाठी बनवतात का? जवळजवळ ९ कोटी रुपयांचा ठेका मिळवणाऱ्या आणि निकृष्ट काम करुन नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर महापालिव्ोÀचा विद्युत विभाग कारवाई करणार की मूग गिळून शांत राहणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पीडित मुलीची सुखरुप सुटका करणा-या तळोजा पोलिसांचे कौतुक