बाईकच्या अर्धवट नंबरप्लेट वरुन पोलीस पोहोचले आरोपीपर्यंत

असा लागला बिल्डर सावजीभाई मंजेरी यांच्या हत्येचा छडा  

नवी मुंबई ः नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सावजीभाई मंजेरी यांची हत्या करणारे मारेकरी ज्या पल्सर मोटारसायकलवरुन आले होते, त्या मोटारसायकलवर नंबर नसताना तसेच त्याचे चेसीस नंबर, इंजिन नंबर मिटविण्याचा प्रयत्न केला असताना फक्त अंदाजावरुन मोटारसायकलचा नंबर शोधून काढत नेरुळ पोलीस या हत्या प्रकरणातील मेहेक जयरामभाई नारीया याच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर सावजीभाई मंजेरी यांची हत्या त्यांच्या मुळ गावातील विरोधकांनी २५ लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणल्याचे उघडकीस आले. दरम्यान, मंजेरी यांची हत्या घडवून आणणारे मुख्य आरोपी पोलिसांच्या रडारवर असून येत्या काही दिवसात त्यांना देखील जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  

सावजीभाई मंजेरी यांच्या गुजरात कच्छ येथील मुळ गावी १९९८ साली बचूभाई धना पटणी याची हत्या झाली होती. बचूभाई पटणी हत्याप्रकणात सावजीभाई आरोपी होते. मात्र, त्यावेळी सावजीभाई यांची सदर हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली होती. त्या गोष्टीचा मृत बचूभाईचे नातेवाईक आणि विरोधकांमध्ये राग होता. त्यानंतर सावजीभाई यांनी आपल्या गावात प्रत्येक गोष्टीमध्ये दबंगगिरी सुरु केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये सावजीभाई यांनी आपल्या मुळ गावी विरोधकांच्या नातेवाईकांना आपल्या हस्तकाच्या मदतीने भरचौकात मारहाण केली होती. अशा पध्दतीने सावजीभाई आपल्या गावात वर्चस्व राखून असल्याने त्यांच्या विरोधकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सावजीभाईंचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असल्याने विरोधकांमध्ये त्यांच्या विषयी असंतोष पसरला होता.  

मंजेरी यांना यापूवार्ी गुजरातमध्ये ३ वेळा मारण्याचा प्रयत्न...
सावजीभाई मंजेरी यांचा कायमचा काटा काढण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी मुंबईत राहणाऱ्या आपल्या ओळखीतील व्यक्ती मार्फत त्यांची हत्या करण्याचा कट रचला आणि बिहार येथील मारेकऱ्यांना २५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. या सुपारी किलरने गुजरातमध्ये सावजीभाई यांची हत्या करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला होता. मात्र, ते प्रयत्न असफल ठरल्यानंतर नवी मुंबईतच त्यांना मारण्याचा कट रचण्यात आला. त्यासाठी मेहेक नारीया याने ओएलएक्सवरुन जुनी मोटारसायकल विकत घ्ोऊन ती मारेकऱ्यांना दिली होती. त्यानंतर १५ मार्च रोजी कौशलकुमार आणि सोनुकुमार या दोघांनी सावजीभाई यांच्यावर पिस्तुल मधून तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

स्पर्श स्पा या मसाज सेंटरवर सीबीडी पोलिसांनी छापा मारुन स्पाच्या मालकाला घेतले ताब्यात