पोट रिपॉट हुक्का पार्लरवर नेरुळ पोलिसांचा पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास छापा
पहाटेपर्यंत सुरु असलेल्या नेरुळ मधील पोट रिपॉट हुक्का पार्लरवर छापा
नवी मुंबई : नेरुळ मधील सेंच्य्रियन मॉलमध्ये बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या पोट रिपॉट हुक्का पार्लरवर नेरुळ पोलिसांनी सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास छापा मारुन सदर हुक्का पार्लर चालकासह वेटर अशा एकुण 3 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जफ्त करुन सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेरुळ मधील सेंच्युरियन मॉलमध्ये पहाटेपर्यंतर हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे व त्यांच्या पथकाने सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सेंच्युरियन मॉल मधील पोट रिपॉट हुक्का पार्लरवर छापा मारला. यावेळी सदर हुक्का पार्लरमध्ये काही ग्राहक हुक्का ओढत बसल्याचे तसेच त्याठिकाणी तंबाखुजन्य पदार्थाचा धुरकट वास व धुर पसरल्याचे आढळुन आले. सदर हुक्का पार्लरमध्ये बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर सुरु असल्याचे आढळून आल्याने नेरुळ पोलिसांनी सदर हुक्का पार्लरचा चालक अमन रवि तिवारी (21) व वेटर प्रल्हाद मंडल (20) व राज दरेकर (22) यांच्यासह हुक्का ओढण्यासाठी बसलेले ग्राहकांविरोधात सिगारेट व तंबाखुजन्य उत्पादने अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन करुन सर्वांना ताब्यात घेतले आहे.