नियम मोडणा-या वाहन चालकांकडून 2 लाख 56 हजार 750 रुपयांचा दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया 413 वाहन चालकांवर कारवाई

नवी मुंबई : रबाळे वाहतूक शाखेने ऐरोली भागात शुक्रवारी विशेष मोहिम राबवून वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया 413 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये नियम मोडणा-या वाहन चालकांना एकूण 2 लाख 56 हजार 750 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.  

रबाळे वाहतुक शाखेने शुक्रवारी आपल्या कार्यक्षेत्रातील माईंड स्पेस कंपनी, ऐरोली सेक्टर-19,20 दिघा, पटणी रोड, तसेच ठाणे बेलापुर मार्ग या भागात विशेष मोहिम राबवुन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया 413 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. वातहुक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या आदेशाने करण्यात आलेल्या या कारवाईत नो पार्किंग, वातहुकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहन उभे करणाऱया 170 वाहनांवर कारवाई करुन त्यांच्याकडुन सुमारे 1 लाख 29 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.  

त्याचप्रमाणे सिग्नल तोडणाऱया 15 वाहन चालकांकडुन 9 हजार 500 , तसेच वैध्य परवाना जवळ न बाळगणाऱया 39 वाहन चालकांकडुन 21 हजार 500 रुपये, तसेच 122 हेल्मेटचा वापर न करणाऱया दुचाकी चालकांकडुन 61 हजार त्याचप्रमाणे इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया 67 वाहन चालकांकडुन 35 हजार 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालकांविरोधात यापुढील काळात देखील कारवाई सुरु राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहने चालवावीत असे आवाहन रबाळे वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक गोपाळ कोळी यांनी केले आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अडीच लाख रुपये किंमतीची बिबटयाची कातडी जप्त