‘आमदार आपल्या दारी'

नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संपर्क व्हावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या याकरिता प्रत्येक प्रभागात ‘आमदार आपल्या दारी' उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने त्यांनी सानपाडा येथील नागरिकांशी संवाद साधला. सानपाडा, सेवटर-७ मधील कै.सीताराम मास्तर उद्यान येथे संपन्न झालेल्या ‘आमदार आपल्या दारी' उपक्रमाप्रसंगी महापालिका  विभाग अधिकारी सुखदेव  येडवे, ‘महावितरण'चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अण्णासाहेब काळे, सहाय्यक अभियंता जितेंद्र पाटील, शिधावाटप निरीक्षक संदीप आचरेकर, सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जयराम राठोड उपस्थित होते. समाजसेवक जगन्नाथ जगताप आणि पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून सदर जनता दरबार घेतला होता.

सानपाडा दत्त मंदिर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी भूखंड मिळणे, सानपाडा येथे सर्व सुविधांयुक्त सेंट्रल लायब्ररी उभारणे, विभागातील पार्किंग समस्या, उद्यानात होणारे अतिक्रमण, अनियमित होणारा पाणी पुरवठा, सानपाडा क्षेत्रात गर्दुल्ले आणि चोरांचा वाढता वावर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा, परिसरातील अस्वच्छता, रस्त्यांचे काँक्रीटीकरण-डांबरीकरण, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण, अपंग योजना अंतर्गत दिव्यांगांना स्टॉल्सचे वितरण, अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न, वाढती विजबिले, स्वतंत्र रुग्णवाहिका पुरविणे, आमदार निधीतून दशक्रिया विधीसाठी निवारा शेड तयार करणे, जेट्टी उपलब्ध करणे, स्वच्छतागृहे उभारणे, सोलर यंत्रणा उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे, जुन्या मोडकळीस आलेल्या ओपन जिमच्या सामानांची दुरुस्ती करणे, स्थानिकांना स्वयंरोजगार उपलब्ध करणे, वाढत्या डास उत्पत्तीबद्दल धूर फवारणी करणे, वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता तसेच ओरियंटल कॉलेज समोर प्रेमी युगुलांवर आवर घालण्याकरिता पोलीस गस्त वाढवणे अशा अनेक विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री विजय घाटे, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, माजी नगरसेविका ऋचा पाटील,  रामचंद्र पाटील, जगन्नाथ जगताप, पांडुरंग आमले, भाऊ भापकर, चिंतामण बेल्हेकर, महेश मढवी, रुपेश मढवी, विवेक भालेकर, श्रीपाद पत्की तसेच सानपाडा मधील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी सानपाडा परिसरातील काही समस्या उपस्थित अधिकाऱ्यांमार्फत त्वरित सोडविण्यात आल्या. तर काही समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिले.

नवी मुंबईत सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज व्हावे याकरिता संपूर्ण नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याअनुषंगाने होणाऱ्या प्रकल्पाला समस्त सानपाडावासियांनीही पाठींबा दिल्यामुळे मी सर्वांचे आभार मानते. सानपाडा दत्त मंदिराशेजारील भूखंड धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांकरिता उपलब्ध करण्याची गरज आहे. त्याबाबत लवकरच शासन दरबारी मागणी आणि पाठपुरावा करणार आहे. सानपाडा परिसरातील असणाऱ्या विविध समस्या संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावण्यात येतील. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 मतदार ओळखपत्राशी आधार जोडणी साठी ‘आप'ची मोहीम