मतदार ओळखपत्राशी आधार जोडणी साठी ‘आप'ची मोहीम

नवी मुंबई ः मतदार ओळखपत्र आधारकार्ड जोडणीसाठी ‘टीम आप नवी मुंबई'तर्फे विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत ‘आप'चे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात पोहोचून आधारकार्ड मतदार ओळखपत्राला जोडणीच्या निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाची माहिती आणि मार्गदर्शन करीत आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र, विधी-न्याय मंत्रालय द्वारे निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. कलम २३ नुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रामाणिकपणाची मतदारांकडून आधाराची माहिती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा अंतर्भूत आहेत. त्या आधारे मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम ६ सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सदर सुधारणांची अंमलबजावणी अंतर्गत मतदार ओळखपत्राशी आधार जोडणी कामकाज १ ऑगस्ट ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत करायचे आहे.

मतदार यांद्यांच्या प्रमाणीकरणासाठी, दुबार नावे वगळण्यासाठी, आधारकार्ड माहितीचा दुहेरी सुरक्षितता यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र तर्फे मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडण्यात यावे या मागणीचा पाठपुरावा टीम आप नवी मुंबई वेळोवेळी निवडणूक आयोगाकडे करीत होतीच. आता ‘टीम आप नवी मुंबई'ने निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंती नुसार सर्व प्रशासकीय परवानग्यांची पूर्तता करीत आधारकार्ड मतदार ओळखपत्राला जोडणीच्या कामात नवी मुंबईतील प्रत्येक निवासी संकुलातील पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून आधार जोडणीबाबत जागरुकता निर्माण करुन नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाला प्रत्यक्ष आधार जोडणी साठी मदत करीत आहे. यासाठी प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रत्येक घराघरात सदर सुरु करण्यात आली आहे. सदर उपक्रमासाठी ‘टीम आप नवी मुंबई'चे पदाधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, सहसचिव देवराम सुर्यवंशी, ऐरोली नोड अध्यक्ष नामदेव साबळे, आरती सोनावणे विशेष परिश्रम घेत आहेत.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिक्षकाच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही सुरु