‘आप-नवी मुंबई टीम'ची दिल्ली मधील सरकारी शाळेला भेट

नवी मुंबई ः महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या स्वप्नातील भारत संविधानाच्या रुपात लिहून ठेवला आहे. त्यामुळे आपले संविधान देशातल्या प्रत्येक चिमुकल्याला शिक्षणाचा हक्क देते. त्याअनुषंगाने ‘आप-नवी मुंबई'च्या जिल्हा सहसचिव नीना जोहरी यांनी नुकतीच दिल्ली येथील सरकारी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन दिल्ली सरकारने घडविलेल्या उत्कृष्ट सरकारी शिक्षण व्यवस्थेची माहिती जाणून घेतली.

आप-नवी मुंबई'चे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त मर्चंट नेव्ही चीफ इंजिनियर सुधीर पांडे यांनी नेरुळ येथे स्वःखर्चाने कार्यालय स्थापन करुन तेथे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण देत आहेत.

दरम्यान, ‘आप आदमी पार्टी'ला नवी मुंबई सुध्दा सामान्य नागरिकांकडून दिल्लीकरांसारखा भरघोस पाठिंबा मिळाल्यास ‘आप-नवी मुंबई'सुध्दा येथील महापालिका शाळांमध्ये दिल्लीसारखी शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यास कटीबध्द असल्याचे ‘आप-नवी मुंबई'चे मुख्य शिक्षण प्रणाली समन्वयक प्रा. डॉ. विलास उजगरे यांनी सांगितले. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सर्वसामान्यांच्या न्यायासाठी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावरची लढाई लढेल - जिल्हाध्यक्ष महेश खरे