आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने 'भगवान बिरसा मुंडा चषक २०२२' 

पनवेल : महान जनजाती स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने व राष्ट्रीय जनजाती गौरव दिना पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा होत आहे. त्याअंतर्गत वनवासी कल्याण आश्रम आणि पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने 'भगवान बिरसा मुंडा चषक २०२२' या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान गाढेश्वर मंदिर येथील भव्य मैदानात रंगणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेश भालेकर, दुदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर पाटील, वाजे ग्रामपंचायतीचे सदस्य पद्माकर वाघ, मालडुंगे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन निरगुडा, दुदरे माजी उपसरपंच शांताराम चौधरी, भाजप जेष्ठ कार्यकर्ते विष्णू चौधरी, युवा कार्यकर्ते विकास भगत, गणेश पाटील, दिलीप पाटील, शत्रुघ्न उसाटकर यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘आप-नवी मुंबई टीम'ची दिल्ली मधील सरकारी शाळेला भेट