सीवुडस्‌ मध्ये आधारकार्ड नोंदणी-दुरुस्ती शिबीर

नवी मुंबई ः हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यास्मृतिदिनानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष सीवुडस्‌ तर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विभागातील नागरिकांसाठी नवीन आधारकार्ड नोंदणी तसेच आधारकार्ड दुरुस्ती शिबिराची सुरुवात करण्यात आली.

सदर शिबिराचे आयोजन विभाग प्रमुख समीर बागवान यांनी सीवुडस्‌, सेवटर-४४ मधील साईपॅराडाईस सोसायटी येथील शिवसेना कार्यालय येथे केले असून शिबीर २४ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत सुरु राहणार आहे. शिबीराच्या उद्‌घाटनप्रसंगी उपशहर प्रमुख सुमित्र कडू, उपविभाग संघटक सौ. वीणा महाडेश्वर, उपशाखाप्रमुख आशिष गायकवाड, उपशाखाप्रमुख सुरेश माळवे, दत्तात्रय साबळे, श्रीकांत बनसोडे, सौ. भारती वैती, सौ. जस्मिन बागवान, सौ. कलावती चव्हाण, आदि उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने 'भगवान बिरसा मुंडा चषक २०२२'