‘महालॅन्ड'कडून गुंतवणुकदारांना लाखोंचा गंडा

नवी मुंबई ः नवी मुंबई विमानतळ तसेच न्हावा-शेवा सी-लिंक जवळ अत्यल्प कमी दरात जमीन खरेदी-विक्री करण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या महालॅन्ड या कंपनी विरोधात ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे प्रववते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून महालॅन्ड कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी गजानन काळे यांनी यावेळी पोलीस आयुक्त बिपीनवुÀमार सिंह ु यांच्याकडे केली आहे.

गुंतवणुकदारांना अत्यंत कमी दरात नवी मुंबई विमानतळ किंवा न्हावाशेवा सी-लिंक जवळील जमीन खरेदी-विक्री करण्याच्या आकर्षक आणि फसव्या जाहिराती फेसबुक, वर्तमानपत्र तसेच इतर माध्यमांतून महालॅन्ड कंपनीकडून देण्यात येत आहेत. या कंपनी विरोधात ‘मनसे'कडे १३ तक्रारी आल्या असून त्यात सुमारे १६ लाख रुपयांची फसवणूक गुंतवणूकदारांची झालेली आहे. सदर  कंपनी गेले कित्येक वर्षे लोकांना अत्यंत कमी दरात जमिनीचे प्लॉट मिळवून देण्याचे जाहिरात प्रसिध्द करायची. या कंपनीचे संचालक पंडीत राठोड असून त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा कार्यभार चेतन बंडेवार सांभाळतात. महालॅन्ड कंपनीच्या जाहिरातींना बळी पडून अनेक सामान्य गुंतवणुकदारांनी कमी दरात जमिनीच्या प्लॉटसाठी आपले पैसे या कंपनीमध्ये गुंतवले. अखेरीस या फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी न्यायासाठी ‘मनसेे'कडे धाव घेतली. यातील एकूण १३ गुंतवणुकदारांनी झालेल्या फसवणुकीची माहिती ‘मनसेे'ला देत त्याच्या पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे देखील दाखवली. या १३ गुंतवणुकदारांची मिळून सुमारे १६ लाख रुपयांची फसवणूक महालॅन्ड कंपनीकडून करण्यात आली असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले. त्यामुळे महालॅन्ड कंपनीची माहिती काढली असता सदर कंपनीच्या संचालकांनी ‘सिडको'ने हस्तांतरीत केलेले प्लॉट या काही फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांना दाखवल्याचे समजले आहे. फसवणूक झाल्याचे गुंतवणुकदारांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित संचालकांना संपर्क साधला असता त्यांनी सातत्याने उडवा-उडवीची उत्तरे त्यांना दिली. तसेच या कंपनीने काही जणांना दिलेले चेक देखील बाऊंस झाले आहेत. गेली कित्येक वर्ष फसवणूक झालेले गुंतवणुकदार आपले पैसे परत मिळण्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महालॅन्ड कंपनी कोणालाही जुमानत नाही, ना कुणाला व्यवस्थित उत्तरे देत आहेत.

दरम्यान, सामान्य जनतेला न्याय मिळावा आणि त्यांचे कष्टाचे पैसे त्यांना परत मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करीत असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले आहे. सदर प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा फसव्या जाहिराती करुन लोकांना लुबाडणाऱ्या कंपन्यांवर पोलीस प्रशासनाने बारीक लक्ष ठेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ‘मनसे'ने यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनवुÀमार सिंह यांच्याकडे केली आहे.

यावेळी ‘मनसे'च्या शिष्टमंडळात गजानन काळे यांच्यासह उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, ‘मनसे विद्यार्थी सेना'चे राज्य सचिव ॲड.अक्षय काशिद, विभाग अध्यक्ष भूषण कोळी, अक्षय भोसले, अमोल आयवळे, ‘मनविसे'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, आदिंचा समावेश होता.

महालॅन्ड कंपनीने दाखविलेल्या जमिनींवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी देखील नाही, अशी जुजबी माहिती ‘मनसे'च्या हाती लागली आहे. मात्र, तरीही सोशल मिडीया आणि वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती या कंपनी मार्फत देण्यात येत आहेत. या कंपनीचे संचालक आणि त्यांचे सहकारी महालॅन्ड, सी-लिंक, इन्फ्राटेक अशा विविध नावाने कंपन्या काढून सर्वसामान्य नागरिकाची फसवणूक करत आहेत. मोक्याच्या ठिकाणी जमिनीच्या प्लॉटच्या खोट्या जाहिराती देऊन लोकांना लुबाडण्याचा प्रकार सर्रासपणे
सुरु आहे. - गजानन काळे, राज्य प्रववता तथा अध्यक्ष - मनसे, नवी मुंबई.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सीवुडस्‌ मध्ये आधारकार्ड नोंदणी-दुरुस्ती शिबीर