हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती करणेबाबत निर्णय

उरण : मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. ३१.०३.२००८ च्या शासन निर्णयामध्ये योग्य ती सुधारणा करून मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या ६ सिलेंडरच्या १२० अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती करणेबाबत निर्णय करण्यात आल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या निर्णयाचा हजारो मत्स्यव्यवसायिकांना लाभ होणार असून या संदर्भात आमदार महेश बालदी यांची मागणी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला आहे. 

          १२० अश्वशक्ति वरील इंजिन क्षमता असणाऱ्या नौकांना डिझेल कोटा व प्रतिपूर्ती मंजूर करण्याबाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत उरण विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांनी  विनंती केली होती. त्या अनुषंगाने आता मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. ३१.०३.२००८ च्या शासन निर्णयामध्ये योग्य ती सुधारणा करून मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या ६ सिलेंडरच्या १२० अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती करणेबाबत निर्णय करण्यात आला आहे. या सुधारणा दि. ३१/०३/२००८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आलेल्या असून या संदर्भातील पत्र राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार महेश बालदी यांना दिले असून सोबत मत्स्यव्यवसाय विभागाचे दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ चे शुद्धिपत्रकही देण्यात आले आहे. यावेळी मोरा सोसायटीचे माजी चेअरमन जयविंद्र कोळी, सुर्यकांत (बबलू) कोळी आदी उपस्थित होते.  मच्छिमारांच्या हितासंदर्भात घेतलेल्या या निर्णयाबद्दल मच्छीमार संघटनांनी मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करा - आ. गणेश नाईक