माजी आमदार मनोहर भोईर यांचे कट्टर समर्थक भाजपात

पनवेल: उरण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यानी कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते त्यांना पक्षाची शाल देऊन भाजपात प्रवेश देण्यात आला. 

          उरण तालुका युवक काँग्रेसचे कैलास भोईर, चाणजे ग्रामपंचायतीच्या सदस्या किंजल कैलास भोईर, माजी आमदार मनोहर भोईर यांचे कट्टर समर्थक जनार्दन रामचंद्र म्हात्रे तसेच त्यांचे मित्र मंडळ यांनी शिवसेनेतून त्याचबरोबर भाताण गावातील काँग्रेसचे अनंत सते, मारुती म्हात्रे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. 

या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम, चंद्रकांत घरत, पंडित घरत, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोईर, प्रसाद भोईर, राजू भोईर, हेमंत भोईर, चाणजे ग्रामपंचायत सदस्य प्रीतम पाटील, सागर वाघमारे, फराज शेख, सोमनाथ आटपाटकर, अजय म्हात्रे, भाताण ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, युवा कार्यकर्ते अनिल भोईर, सुमित मुकादम आदी उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती करणेबाबत निर्णय