मागण्या मान्य न झाल्यास शंखनाद मोर्चा काढण्याचा ‘मनसे'चा इशारा

नवी मुंबई ः नवी मंबई महापालिका मध्ये काम करणाऱ्या १७ विभागातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना'च्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते. दरम्यान, गेली कित्येक वर्षे मनसे मनपा कामगार कर्मचारी सेना कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा आणि आंदोलने करीत आहे. त्यामुळे केलेल्या मागण्यांबाबत येत्या ७ दिवसात महापालिका प्रशासनाकडून उचित कार्यवाही न झाल्यास महापालिका विरोधात शंखनाद मोर्चा काढण्याचा इशाराही ‘युनियन'तर्फे यावेळी देण्यात आला.


सदर भेटीवेळी ‘मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेना'च्या शिष्टमंडळाने आयुवत राजेश नार्वेकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी ‘मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेना'तर्फे करण्यात आलेल्या मागण्यांबाबतआयुक्त नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

‘मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेना'मनसेच्या सदर शिष्टमंडळात नवी मुंबई अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, चिटणीस अशोक पाटील, सहचिटणीस रणजीत सुतार, उपाध्यक्ष देवा भोईर, संदीप सुतार, महेंद्र पाटील, महेंद्र म्हात्रे, विष्णू शेळके, युनियन संघटक नीलकंठ कोळी, सुनील रायबोले आणि इतर कामगार बांधव उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माजी आमदार मनोहर भोईर यांचे कट्टर समर्थक भाजपात