हॉस्पिटल भूखंडाची रवकम १५ दिवसात भरा; अन्यथा २५ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालयासमोर जनआंदोलन

नवी मुंबई ः सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज उभारण्यासाठी ‘सिडको'कडून वितरीत होणाऱ्या भूखंडाची रक्कम त्वरित न भरल्यास येत्या २५ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालय समोर जनआंदोलन करण्याचा इशारा ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुवतांना पत्राद्वारे दिला आहे.

नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्ोतला असून ‘सिडको'ने सदरबाबत भूखंड देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला. सर्व गोष्टी सकारात्मक असताना नवी मुंबई महापालिका प्रशासन सदर भूखंडाची रक्कम भरण्यास चालढकलपणा करीत आहे. नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या विकासकामाला नवी मुंबई महापालिका जाणूनबुजून वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ‘सिडको'कडे सदर भूखंडाची रवकम येत्या १५ दिवसात न भरल्यास येत्या २५ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालय समोर जनआंदोलन करण्याचा इशारा आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पत्राद्वारे महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांना दिला आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारण्यासाठी सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद असताना महापालिका प्रशासनाचा सुरु असलेला सावळागोंधळ कदापि खपवून घेतला जाणार नाही. नवी मुंबईतील सर्व नागरिकांचे प्रस्तावित अर्ज सातत्याने माझ्याकडे येत असून नागरिकांच्या मागणीनुसार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज उभारणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. अन्यथा मी २५ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालयासमोर नवी मुंबईतील सर्व नागरिकांना घेऊन जनआंदोलन करणार आहे. -आमदार मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आमदार मंदाताई म्हात्रे यांचा सीवुडस्‌वासियांशी संवाद