एपीएमसी मार्केटमध्ये स्वतंत्र काजू विक्री केंद्र

कोकणातील शेतकऱ्यांचा काजू विक्रीसाठी पुढाकार

वाशी ः रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी पुढाकार घेवून काजू विक्रीसाठी थेट वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये नवे दालन उघडले आहे. या दालनाचे उद्‌घाटन नवी मुंबई शहर मनसे अध्यक्ष गजानन काळे यांच्या हस्ते एपीएमसी मसाला मार्केट येथे १० नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

याप्रसंगी मनसे नेते बाळासाहेब शिंदे, नीलेश बानखेले, प्रसाद घोरपडे, विलास घोणे, विवेक बरगिर, संभाजी काजरेकर, संदेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते

काजू प्रक्रिया संघ, रत्नागिरी यांच्या माध्यमातून एपीएमसी मसाला मार्केट मध्ये स्वतंत्र काजू विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. मनसे नेते बाळासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून काजू प्रक्रिया उत्पादक संघ यांच्यासाठी एपीएमसी प्रशासनाशी चर्चा करुन भाड्याने जागा घ्ोवून एपीएमसी मसाला मार्केट मध्ये स्वतंत्र काजू विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे काजू उत्पादक शेतकरी आता उत्कृष्ट आणि प्रक्रिया केलेल्या काजूची विक्री करणार असून, काजू विक्री संबंधात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना यासाठी लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, काजू विक्री केंद्रातून मुंबई आणि परिसरात काजूची विक्री केली जाणार असून, काजू महोत्सव आयोजित करुन कोकणातील शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे मनसे नेते बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

हॉस्पिटल भूखंडाची रवकम १५ दिवसात भरा; अन्यथा २५ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालयासमोर जनआंदोलन