घणसोली सेवटर-४ मधील नागरी आरोग्य केंद्र तात्काळ सुरु करण्याची मागणी
नवी मुंबई ः घणसोली, सेक्टर-४ येथील महापालिकेचे नागरी आरोग्य केंद्र लवकरात लवकर जनतेसाठी खुले करावे, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना' घणसोली विभाग तर्फे महापालिका सहाय्यक आयुवत तथा घणसोली विभाग अधिकारी शंकर खाडे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचे संकट येण्यापूर्वीपासून महापालिकेने घणसोली, सेवटर-४ येथील नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. तसेच त्याचे रंगकाम देखील पूर्ण झाले आहे. नागरी आरोग्य केंद्र बांधून तयार होऊन देखील तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटून गेल्याने त्याचे लोकार्पण न झालेले नाही. परिणामी, एकाही सामान्य नागरिकास त्याचा फायदा झालेला नाही. सरकारी काम, बारा महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे. या उवतीनुसार जर नवी मुंबई सारख्या स्मार्ट सिटी मध्ये एखादा शासकीय प्रकल्प सुरु होण्यास ३ ते ४ वर्ष लागत असतील तर ग्रामीण तसेच आदिवासी भागात योजना पोहोचविण्यास किती वर्षांचा कालावधी लागत असेल? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच फक्त विकासकामे तसेच स्वच्छ सर्वेक्षणात दाखविण्यासाठी नागरी आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे, असा नाराजीचा सूर स्थानिक रहिवाशांमधून दिसून येत आहे, असे ‘मनसे'ने महापालिका प्रशासनाला दिलेल्या सदर निवेदनात नमूद केले आहे.
त्यामुळे घणसोली विभाग अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून सदर नागरी आरोग्य केंद्र पुरेशी अद्ययावत यंत्रसामुग्री, वैद्यकीय कर्मचारी-अधिकारी यांच्यासह जनतेसाठी खुले करावे, अशी मागणी ‘मनसेे'च्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रसंगी सहाय्यक आयुवत शंकर खाडे यांना निवेदन देण्यासाठी ‘मनसे'चे विभाग अध्यक्ष नितीन नाईक, उपविभाग अध्यक्ष बालाजी लोंढे, महाराष्ट्र सैनिक ज्ञानेश्वर सुतार, शाखा अध्यक्ष नितीन काटेकर, आदि उपस्थित होते.