कुणाल घरत यांचा वाढदिवसानिमित्त स्टॉल हस्तांतरण, रुग्णवाहिका लोकार्पण

युवा नेते कुणाल घरत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

पनवेल ः वडिलांकडून सामाजिक बांधिलकीचे धडे गिरवत कोरोना काळात हजारो गरजूंना शिजवलेले अन्न आणि जीवनावश्यक अन्नधान्याची मदत करणारे युवा नेते कुणाल महेंद्र घरत यांचा वाढदिवस ४ नोव्हेंबर रोजी विविध समाजपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कोरोना काळात यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था तर्फे ४ रुग्णवाहिका २४ तास रुग्णांना सेवा देत होत्या. त्यामुळे रुग्णवाहिकेचे महत्व समजून उलवे नोडसाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे गांभीर्य लक्षात घ्ोऊन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी त्यांचे पुत्र कुणाल महेंद्र घरत याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिका लोकार्पण केली. तसेच रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या रोटरी घनदाट जंगल प्रकल्पास ५० झाडे संवर्धनासाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला.


उलवे नोड काँग्रेस पक्ष कार्यालय मध्ये छोटेखानी कुणाल घरत वाढदिवस समारंभात महेंद्र घरत यांच्या तर्फे कळंबोली येथील राजू लक्ष्मण आदमळे यांना स्टॉल हस्तांतरण आणि रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.


याप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख तथा जेष्ठ नेते बबनदादा पाटील, नाशिक येथील प्रसिध्द उद्योजक प्रकाश चौधरी, उद्योजक सुरेश पाटील, माजी उपसभापती वसंत काठावले, पनवेल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नंदराज मुंगाजी, उरण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद म्हात्रे, पेण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक मोकल, खोपोली शहर काँग्रेस अध्यक्ष रिचर्ड जॉन, रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष किरीट पाटील, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निखील डवळे, पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. निर्मला म्हात्रे, पनवेल तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.  योगिता नाईक यांच्यासह शेकडोंच्या संख्येने नातेवाईक आणि मित्रमंडळींनी उपस्थित राहून कुणाल घरत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.


राजू लक्ष्मण आदमळे मुळचे सातारा येथील असून, सध्या कळंबोली येथे राहत आहेत. राजू आदमळे घरोघरी अगरबत्ती विकण्याचे काम करत होते. मध्येच त्यांना अर्धांग वायूचा झटका आला. त्यामुळे राजू आदमळे हतबल झाले होते. त्यांनी त्यांची कैफियत आपणास सांगितल्यानंतर त्यांना जागेवर बसून धंदा करण्यासाठी स्टॉल बांधून दिला आहे. या स्टॉलची चावी राजू आदमळे यांना कुणाल घरत याच्या वाढदिवशी दिली. - महेंद्र घरत, अध्यक्ष - रायगड जिल्हा काँग्रेस. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेजचा मार्ग मोकळा