आज सावित्री.. पण उद्या काय तेच ते, पेच जे!

आता सहा महिने ते साठ सत्तर वयाच्या आई, आज्जीवर, देखील बलात्कार होत आहेत, आता फक्त गर्भातील मुलींवर बलात्कार होणे बाकी आहे, इतके आम्ही गेंडे कातडीचे, आतडी बहाद्दर होत आहोत. कल्याणच्या सुभेदाराची सून हा किस्सा पुरे झाला आता, ते छत्रपती होते, आज त्याच कल्याणच्या लहान बाळावर, मुलीवर झालेला बलात्कार यावर जरा निदान सावित्रीच्या लेकी बाळीनी नको का व्यक्त व्हायला?

फक्त कपाळावर चीर भरून, जिजाऊ,सावित्री, अहिल्या यांचा वारसा आपण नाही चालवू शकत. त्यासाठी खंदे खांदे, जे अशक्त नाहीत तर सशक्त असतील असे, तयार करणे गरजेचे आहे. मुळात शिक्षण घेऊन जेव्हा आपण अडाणी होत अनवाणी सारखे वागतो, चालतो, अंधपणे उपवास, व्रत करत सुटतो ,विज्ञान विसरतो, तेव्हा आपण सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर चालतोय का? हा विचार केला पाहिजे. एक समाज शिक्षक, राष्ट्र शिक्षक म्हणून तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, साने गुरुजी यांच्या विचारांवर नाही का, आपण उभे राहू शकत, हा देखील विचार होणे गरजेचे आहे.

   फुलेंच्या सावित्रीचा वसा, ठसा चालवणाऱ्या हिरकणी कमी होत आहेत, मात्र सत्यवानाच्या सावित्री फोफावत आहेत, हे शल्य आहे. स्वतः प्रतिमा आणि प्रतिभा असणाऱ्या रण रागिणी कमी झाल्या असे ही नाही, मात्र त्या दिसत आहेत, असेही नाही! जिजाऊ,सावित्री यांची चंद्रकोर कपाळावर लाऊन आपला व्हॉट्‌स ॲप वर फोटो ठेवत स्टेटस्‌ वाढवणाऱ्या लेकी खूप मशरूमसारख्या झाल्याचे दिसते, मात्र खरी कस्तुरबा, अहिल्या, इंदिरा, किरण बेदी, कल्पना चावला, मृणाल गोरे यांचा वारसा, आरसा समजत आज ...आग, बनत झंझावात होणाऱ्या वास्तव विस्तव असणाऱ्या गांधील माश्या.. विरळ होत ,नको त्या माश्या व्हायरल होत आहेत. जिजाऊ हिरकण्या पेटून उठल्या पाहिजेत.., जेव्हा तेच, निर्माल्य विझून, थिजून कोळसा झाल्यासारखे वाटतं, तेव्हा सावित्रीच्या कळा,प्रसव कळा, वेदना होत जातात,  किती कोवळ्या कळ्यांवर अत्याचार होत आहेत, तरी आम्ही अगदी ढ आहोत.पूर्वी आपली पिढी लहान असताना, पेट्रोल फक्त तीन, चार पैसे लिटर मागे वाढत असे, तरी भारत बंद होई, आता सहा महिने ते साठ सत्तर वयाच्या आई, आज्जीवर, देखील बलात्कार होत आहेत, आता फक्त गर्भातील मुलींवर बलात्कार होणे बाकी आहे, इतके आम्ही गेंडे कातडीचे, आतडी बहाद्दर होत आहोत.

 कल्याणच्या सुभेदाराची सून हा किस्सा पुरे झाला आता, ते छत्रपती होते, आज त्याच कल्याणच्या लहान बाळावर, मुलीवर झालेला बलात्कार यावर जरा निदान सावित्रीच्या लेकी बाळीनी नको का व्यक्त व्हायला? किती दिवस "आळी मिळी गप्प राहून तोंडावर बोटं, हाताची घडी आणि वरून बुक्यांचा मार सहन करणार? सात आठशे, तीन चारशे वर्षापूर्वी झालेल्या लोकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करू या, त्यात वावगे काहीही नाही; मात्र येणाऱ्या शे सव्वाशे वर्षात, आपली देखील जयंती, पुण्यतिथी कॅलेंडर वर तारखेत दिसावी असे का नाही वाटत? लोकांनी गुरे ढोरे, झाडा झुडपासाठी, किडे मुंग्यांसाठी जीवन वेचून संपन्न केले, आम्ही आज माणसामाणसासांठी देखील...सावित्री, बाई नव्हे आई बनायला तयार नाहीत, ही खंत आहे. घरातील घरट्यातून बाहेर उडू, पडू या, अडल्या नडल्यास हात होऊ या, घात नको.

म्हातारी मेल्यांचे दुःख नाही, काळ डोकावत, सोकावत आहे, जरा खऱ्या सावित्री, जिजाऊ, अहिल्या..होऊ या!
-शिव व्याख्याता रवींद्र ऊ. पाटील 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शेअर मार्केट मधील फसव्या App द्वारे फसवणूकीचा नवा फंडा