चामराजेश्वर स्वामी मंदिर

म्हैसूर राज्याचा महाराजा मुम्मदी कृष्णराजा वाडियार याने १८२६ मध्ये चामराजेश्वर स्वामी मंदिर आपले वडील चामराजा वाडियार यांच्या स्मरणार्थ बांधले. पूर्वी अरिकुटारा या नावाने ओळखले जाणारे शहर त्यांच्या वडिलांच्या नावावरून चामराजनगर असे नामकरण करण्यात आले.

चामराजेश्वर मंदिराजवळील जनान मंडपासमोर उभ्या असलेल्या एका मोठ्या स्लॅबवर कोरलेला शिलालेख महाराजांच्या जन्मस्थानाची माहिती देतो. मंदिरातील शिवलिंग शृंगेरी मठाने मांडले आणि त्याला चामराजेश्वर असे नाव देण्यात आले. मुम्मदी कृष्णराजा वाडियार यांना त्यांच्या आईच्या स्मरणार्थ चामराजेश्वर लिंगाच्या डाव्या बाजूला केंपनांजंबा देवीची मूर्ती बसवली.

द्रविड स्थापत्यकलेच्या भव्य मंदिरात शिखरावर पाच चकचकीत पितळी कलश असलेले ७० फूट उंच पाच-स्तरीय राजा गोपुरम आहे. मंदिरात देवी-देवतांचे नक्षीकाम आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर डावीकडे गणपती आणि उजवीकडे देवी चामुंडेश्वरी आहे.मंदिरात दोन मंडप आहेत. मुख-मंडप (खुले खांब असलेला हॉल) आणि नंदी मंडप, आणि गर्भगुडी (गर्भगृह). सर्व मंडपांमध्ये देवी-देवतांच्या आकृतिबंधांचे विस्तृत कोरीवकाम केलेले आहे.

होयसाळ वास्तुशिल्पाचा नमुना या मंदिरात पाहायला मिळतो. या मंदिराची सर्वात महत्वाची रचना म्हणजे त्याचा गोपुरा (बुरुज). या टॉवरची उंची २२ मीटर आहे आणि या टॉवरवर अनेक आकृतिबंध आणि लघुचित्रे आहेत. हे अनेक हिंदू देवतांसह चांगले कोरलेले आहेत प्रत्येकावर एक विशेष कथा आहे. येथे अनेक प्रकारचे स्टुको देखील आढळतात. यामध्ये प्रामुख्याने देव आणि दानवांनी अमृत बनविण्याचे पुराण वर्णन केले आहे. त्यात वैदिक काळातील अनेक चित्रेही आहेत. येथील देव आणि देवीची शिल्पे एकाच दगडात बारीक कोरलेली आहेत आणि ती त्याच्या कारागिरीत अतिशय मोहक दिसतात. नंदी (बैल) नावाचा भगवान शिवाचा रक्षक प्राणी, थेट भगवान शिवाच्या मुख्य देवतेकडे तोंड करून प्रवेशद्वारावर उत्तम प्रकारे ठेवलेला आहे. भारतातील सर्व शिवमंदिरांमध्ये हे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. मुख्य गर्भगृहात ६ लिंग आहेत. अमावास्येच्या पूजेसाठी नवग्रहांचा सुंदर संच येथे सुंदरपणे बांधला आहे. त्याचे काही शिल्पकारही श्रीरंगपटिनम येथून  आणण्यात आले होते.

मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच त्याचा ऐतिहासिक १८० वर्ष जुना रथ आहे. प्रसिद्ध रथोत्सव (कार उत्सव) आषाढ महिन्यात साजरा केला जातो.१८३६ मध्ये आषाढ पौर्णिमेला पहिला रथोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि रथाचे चाक १९७०मध्ये बदलण्यात आले होते. दुर्दैवाने, फेब्रुवारी २०१७ मध्ये एका गैरकृत्याने ऐतिहासिक रथ अर्धवट जाळला होता. तेव्हापासून एकही रथ मिरवणूक निघाली नाही.

कनकगिरी जैन मंदिर
कनकगिरी हे एकमेव जैन मंदिर आहे जिथे कालसर्पदोष परिहार पूजा केली जाते.धरणेंद्र आणि पद्मावती आकृत्या असलेल्या सापाच्या फडाची अद्वितीय मूर्ती इथे आहे. ही मूर्ती सध्या सुखनासीमध्ये ठेवण्यात आली आहे.

३५० पायऱ्यांच्या टेकडीवरील हे मुख्य मंदिर एका किल्ल्यात बंदिस्त आहे, त्याचे चार मुख्य भाग आहेत, ते म्हणजे मुखमंडप, नवरंग, सुखनसी आणि गर्भगृह. या मंदिरात पार्श्वनाथ, पद्मावती, ज्वालामालिनी, कुष्मंदिनी आणि क्षेत्रपाल ब्रम्हा यक्ष या पाच मुख्य देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात भगवान पार्श्वनाथाचे निवासस्थान आहे . २४ तीर्थंकरांची ३ मंदिरे  आहेत. या मंदिरात बाहुबलीची १८ फूट अखंड मूर्तीदेखील आहे.

मंदिर परिसराजवळ २४ तीर्थंकरांची २४ चरणे आहेत. टेकडीवर गुहा आहेत जिथे जैन संतांनी एकदा ध्यान केले होते. टेकडीच्या पायथ्याशी स्वस्ती श्रीभुवनकीर्ती भट्टारका स्वामीजींच्या आश्रयाने जैन मठ आहे. - सौ.संध्या यादवाडकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 आज सावित्री.. पण उद्या काय तेच ते, पेच जे!