पुस्तकात न सापडणाऱ्या गोष्टी..

एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला हे पूर्वी फक्त ऐकिवात होतेे. परोपकार वगैरे शब्द विसरलेल्या समाजामध्ये हा चमत्कार आपल्याला वाटेल. मूल्य आणि संस्काराशिवाय दुसऱ्यासाठी जगणं या गोष्टी होऊ शकत नाहीत. समाजसेवा हा काही प्रकल्प नसतो. समाजसेवा हा एक संकल्प असतो. संकल्प तडीला नेणारेच पायवाट निर्माण करू शकतात. वस्तूंचा संग्रह करायचा नाही एवढं  जगण्यासाठी आवश्यक आहे व तेवढेच स्वतःला घडवण्यासाठी पुरेसं असतं. आपल्यावरील बंधनं आपल्याला स्वमग्न अवस्थेतून बाहेर काढतात.

कसल्या कसल्या विचाराने, प्रेरणेने लोकं भारलेली असतात. भारावलेपण जेव्हा कृतीत उतरतं तेव्हा ती प्रेरणेची पायवाट बनते. सामान्य माणसे भारूनही जातात; पण लगेच विरूनही जातात. संकल्प उत्साहात करून माणसे दुसऱ्या दिवशी पुन्हा तो पाळत नाहीत व चाकोरीबध्द जीवन जगतात. माणसे स्वकेंद्रित होत असताना, स्वार्थी होत असताना कुठेतरी समाजामध्ये यशोगाथा जेव्हा दिसते, तेव्हा अनेकांनी ठरवून टाकलेलं असतं की आपणही आपला वाटा उचलायला हवा. अनेकांना आपलीच दुःखं मोठी वाटतात आणि त्याला ते कुरवाळत बसतात.

आमची मूल्य व्यवस्था ठरवते भविष्यात आणि आयुष्यात आम्ही कोण होणार ! स्वतःचे दुःखं, अश्रू पुसण्यात माणसे दंग असतात. आपली इतरांशी तुलना करण्यात माणसें आयुष्य खर्ची घालतात. आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा आपली साठा करण्याची प्रवृत्ती बळावते, त्याच्याकडे जे नाही ते जमवण्याच्या नादात माणसे भौतिकतेच्या आहारी जातात. भौतिक गोष्टी कमावण्याच्या नादात माणसे उपभोग घ्यायचा विसरतात किंवा घेऊ शकत नाही अशी परिस्थिती येते.

दिव्यांग नसतानाही खोटे प्रमाणपत्र सादर करून दिव्यांगांची सर्व पदे मिळवायची असेही सुरू झाले आहे, त्यामुळे खऱ्या दिव्यांगांना बऱ्याच वेळा सोयी सुविधांपासून दूरच राहावे लागते. प्रमाणपत्र हे आज व्यक्तिमत्त्वाचं परिमाण झालं आहे. पूर्वी प्रमाणपत्र कामगिरी पाहून दिल जात असे; आता ते पैसे देऊन काहीजणांना सहज मिळवता येतं.
समाजाला फसवणाऱ्या जमान्यामध्ये काही अशाही व्यक्ती आहेत की ज्या आपल्यातला  वाटा समाजासाठी देतात. स्वतःचीच नाही तर आपल्या सात पिढ्यांची कमाई करणारे कुठे? आणि आपल्या कमाईतील वाटा इतरांना वाटणारे कुठे?

आपल्याजवळचं दुसऱ्यांना देण्याची वृत्तीच संपली आहे. अशा समाजात दानशूर वृत्ती जोपासली जाणं हा केवळ मूल्यांचा परिणाम आहे. लहानपणी आम्हाला कोणीतरी काहीतरी चांगलं शिकवतं आणि ते आमची पायवाट बनतं. समाज सेवा केवळ फोटोसाठी नसते तर दुसऱ्यांच्या पोटासाठी असतें व काळजी घेण्यासाठीही असते याची जाणीव व्हायला हवी.

आज समाजसेवा स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतले जाते. अनेक मोफत शिबिरामधून स्वतःच्या व्यवसायाचा फायदा करून घेणारी मंडळी आहेतच. मोठं बॅनर व त्यावर आपला मोठा फोटो सतत लोकांच्या समोर आणून त्यांच्या मनावर प्रहार करीत करीत जम बसवणारी मंडळीही आहेत. आपण हे केलं आपण ते केलं हे दाखवत माणसे अनेक गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. व्यवस्थेला छेद देणारी माणसेही असतात. त्यापैकीच एक म्हणजे हैदराबादचे मोहम्मद सुजाथुल्ला. ज्यांनी  सरकारी रुग्णालयाबाहेर भुकेल्या लोकांना मोफत जेवण देण्यासाठी ह्युमॅनिटी फर्स्ट फाउंडेशन सुरू केले. त्यांनी गरजूंसाठी ह्युमॅनिटी फर्स्ट हॉस्पिटलही सुरू केले आहे.

मोहम्मद सुजाथुल्ला यांनी २०१६ मध्ये २२ वर्षांचे असताना सामाजिक कार्याला सुरुवात केली. २०१६ पासून, तो हैदराबादमधील तीन सरकारी रुग्णालयांमध्ये १००० हून अधिक लोकांना मोफत नाश्ता देत आहे.

आज, मोहम्मद सुजाथुल्ला, ज्यांच्याकडे Pharm D पदवी आहे, यांनी ह्युमॅनिटी फर्स्ट फाउंडेशन नावाचे एक फाउंडेशन स्थापन केले आहे, ज्याद्वारे त्यांनी आतापर्यंत १० दशलक्षाहून अधिक मोफत जेवण दिले आहे.

एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला हे पूर्वी फक्त ऐकण्यात होतो. परोपकार वगैरे शब्द विसरलेल्या समाजामध्ये हा चमत्कार आपल्याला वाटेल.

मूल्य आणि संस्काराशिवाय दुसऱ्यासाठी जगणं या गोष्टी होऊ शकत नाहीत. समाजसेवा हा काही प्रकल्प नसतो. समाजसेवा हा एक संकल्प असतो. संकल्प तडीला नेणारेच पायवाट निर्माण करू शकतात. वस्तूंचा संग्रह करायचा नाही एवढं  जगण्यासाठी आवश्यक आहे व तेवढेच स्वतःला घडवण्यासाठी पुरेसं असतं. आपल्यावरील बंधनं आपल्याला स्वमग्न अवस्थेतून बाहेर काढतात.

आपल्याला जे नको आहे ते इतरांना देणं ही समाजसेवा नव्हें. अनेकांनी गोशाळा या माध्यमातून गाईंची सेवा केलेली आहे. आज प्राणिमात्रावर दया करा म्हणून सांगणारे व ते करणारेही अनेक जण आपल्याला दिसतात; पण सातत्याने एखादा उपक्रम दुसऱ्यासाठी राबवणे याचं हे उत्तम उदाहरण आहे. प्रेरणेशिवाय समाजसेवा होत नाही. प्रेरणेतून एखादी यशोगाथाच निर्माण होत नाही; तर अनेकांना अनेक यशोगाथा सापडतात. - डॉ.अनिल कुलकर्णी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वाळूत हरवलेली सुई