पंचनामा
भीतीचा धोका कि, धोवयाची भीती?
सध्याच्या जगात प्रत्येकजण एक एकटा पडत चालला आहे. एकत्र कुटुंंब व्यवस्था लयाला गेली आहे आणि घर म्हणजे केवळ चार भिंतीचे खोपटे बनले आहे. आजूबाजूला कोणी मनुष्यप्राणी नसल्यामुळे काही संपर्क करता न आल्यास व्यवती एकटी पडते व या एकटेपणाची सगळ्यांनाच भीती वाटते. मनाला संपवण्यासाठी दिशा सापडली नाही, की ते उलट दिशेला अंधारात चाचपडू लागते. म्हणजे त्याला जंगली श्वापदे, भूत-प्रेत अशा सर्व कल्पना डोवयात येतात आणि तशा आकृत्याही त्याला दिसू लागतात. मग भीती अधिकच वाढते.
या जगात भीती न वाटणारा कोणीही नाही. प्रत्येक जण स्वतःला कितीही बलवान व ‘तिसमारखां' समजत असला तरीही त्याला कशाची ना कशाची भीती वाटतच असते. जंगलात वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, सरपटणाऱ्या प्राण्यात, साप, अजगर वा इतर खुँंखार व जहरिले प्राणीही कशाला ना कशाला घाबरतच असतात. मग प्रश्न येतो की, त्यांच्यात ही भीती कशामुळे येते? त्याचे साधे सरळ उत्तर म्हणजे त्यांना वाटणारी असुरक्षितता. जेव्हा मनाला असुरक्षितता वाटते तेव्हा तो भीतीच्या आहारी जातो व स्वतःला सुरक्षित करण्याची धडपड करतो. तो धडपड करताना त्यांच्याकडून अशा अनेक चुका होतात की, त्यामुळे त्यांच्या असुरक्षितेत घट होण्याऐवजी भरच पडते.
नुकताच भारत ऑस्ट्रेलिया ‘वर्ल्डकप क्रिकेटचा सामना' पार पडला त्यात ऑस्ट्रेलियाने जीत संपादन केली खरी; पण, वर्ल्ड कपच्या सगळ्या सामन्यात अपराजित राहिलेल्या भारताला पराभवाचा सामना का करावा लागला? कारण भारतीय संघावर जिंकण्याचे दडपण होते. या दडपणाच्या ओझ्याखाली भारतीय खेळाडू आपला नैसर्गिक खेळ करण्याचे विसरुन गेले व त्यांनी बचावात्मक खेळ खेळण्यास सुरुवात केली. तेथेच त्यांची हार पवकी झाली. उलट ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंनी ‘करो वा मरोचा' पवित्रा घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला; तेथेच त्यांची जीत पवकी झाली.
हीच स्थिती प्रत्येक व्यवितची असते. तो सतत आपल्या जीवाला, प्रतिष्ठेला, जपण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनेकवेळा त्याच्या जिवाला वा प्रतिष्ठेला छेद देण्याचे काम त्याच्याच जवळची माणसे करत असतात. म्हणूनच म्हटले जाते की, ‘घर का भेदी, लंका ढाये!'
भीतीमुळे माणसाची अशी गाळण उडते की, हात-पाय थरथर कापणे, हात पाय गळणे, सर्वांगाला घाम सुटणे, छातीत धडधडणे, छातीत दुखणे, हातापायाला मुंग्या येणे, गरगरल्यासारखे वाटणे, श्वास घेता येत नाही असे होऊ लागते. थोडवयात भीतीमुळे जीव घाबरा होतो आणि आपल्याला हे काय होतेय ते न कळल्यामुळे आणखीनच भीती वाटते. समोर वाघ नसतांना, संकट नसताना देखील भीतीची भीती वाटत राहते.
एखाद्या गोष्टीचे दडपण येते, आत्मविश्वास कमी होतो मनात नसत्या शंका-कुशंका येतात. हे नवकी का घडते? काय चालले आहे मनात? मनोव्यापार का मनोविकार? मनाचे खूप सारे गाेधळ, का फवत आभासी प्रतिमा? आपल्या मनाची जडण-घडण इतकी वेगळी असते, की त्यानुसार आपण आपल्या गोष्टी ठरवत असतो. आपल्या सर्वांनाच छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद हवा असतो. पण बहुतेक वेळेला तो मिळत नाही. कधी आपला अपेक्षाभंग होतो, तर कधी आपल्या आशा-आकांक्षा अपूर्ण राहतात. हा जगाचा नियमच असतो; पण अशावेळी आपण आपल्या मनातील किंतु आणि परंतुला जागृत करतो आणि मग तयार होते आपणच तयार केलेल्या भीतीचे एक पटल. बहुतेक वेळेला भीती वाटण्यामागे जर तर ही भावना जास्त असते. जर असे घडले तर कसे होईल, हे नाही झाले तर काय होईल आणि या गोष्टीमधूनच विचारांचे भ्रम सुरु होतात.
एका क्षणी आपल्या मनाला असुरक्षिततेची जी भावना होते ती भावनाच म्हणजे भीती. मनुष्याला भीती वाटली की अंग गार पडते, पाय लटलटायला लागतात. भीती का वाटते व सर्वात मोठी भीती कसली? मृत्युची भीती एवढी का वाटावी. ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तरात नुसता सारखेपणा दिसतो असे नव्हे या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर मिळते, ते म्हणजे एकटेपणा. मनुष्याला एकटेपणाची खूप भीती वाटते. संपर्क हाच मुळी मनुष्याचा स्वभाव आहे. मनामुळे मनुष्य असतो. सारखे फिरणे किंवा विचार करणे आणि स्वतः सोडून इतर जगाकडे पाहणे. जगातील इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे हा मनाचा गुणधर्म आहे. मनुष्याच्या बाबतीतच नव्हे तर सर्वच प्राण्यांच्या बाबतीत संपर्क हा फारच महत्त्वाचा व अगत्याचा असतो.
सध्याच्या जगात प्रत्येकजण एक एकटा पडत चालला आहे. एकत्र कुटुंंब व्यवस्था लयाला गेली आहे आणि घर म्हणजे कवळ चार भिंतीचे खोपटे बनले आहे. आजूबाजूला कोणी मनुष्यप्राणी नसल्यामुळे काही संपर्क करता न आल्यास व्यवती एकटी पडते व या एकटेपणाची सगळ्यांनाच भीती वाटते. मनाला संपवण्यासाठी दिशा सापडली नाही, की ते उलट दिशेला अंधारात चाचपडू लागते. म्हणजे त्याला जंगली श्वापदे, भूत-प्रेत अशा सर्व कल्पना डोवयात येतात आणि तशा आकृत्याही त्याला दिसू लागतात. मग भीती अधिकच वाढते. स्मशानासारख्या एखाद्या निर्जनस्थळी एखादे श्वापद बसलेले असले, पण दोन माणसे बोलत निघाली तर त्यांचे त्या श्वापदाकडे लक्षही जात नाही. त्यांना भीती वाटत नाही आणि ती बोलत-बोलत निघून जातात. आपण स्मशानातून आलो हे त्यांना नंतर कळते किंवा त्यांच्या लक्षात येते. या ठिकाणी एखाद्याला एकट्याने जायला सांगितले, तर ते त्याला शवय होईल असे नाही.
भीती वाटली की थंडी वाजणे व थंडी वाजली की, अधिकच भीती वाटणे असे चक्र सुरु होणे साहजिक आहे. कुठलीही विध्वंसक शवती जर भौतिक रुपात नसेल, तर तिच्या अस्तित्वामुळे वातावरण खूप थंड आहे असे वाटते. मृत्यू आला की आपण आता एकटे पडणार अशी भीती वाटत असते. त्यामुळे माणसाला हवी असते ऊब आणि ऊबेमुळे मिळणारा आनंद व संपर्क. संपवण्याची कल्पना ऊब देते.
एखाद्या संध्याकाळी एखाद्या व्यवतीला नुसते फोन करायचे ठरविले की, बरे वाटते. साहजिकच समाधान ही ताणविरहित अवस्था व ह्या आकर्षणालाच प्रेम म्हणायचे. म्हणून माणसाला प्रेम मिळणे हा ऊब मिळण्याचाच आनंद असतो व त्यामुळे तो सुखी होतो. मनाचा उबदारपणा, प्रेमाचा जिव्हाळा कोणाला हवाहवासा वाटत नाही? आईच्या पोटात बाळ आकार घेते, तेव्हापासूनच त्याने ही प्रेमाची ऊब अनुभवलेली असते. जन्मानंतरही आईच्या स्पर्शाद्वारा, स्तनपानाद्वारा ही ऊब मिळत राहणे बाळाच्या विकासासाठी आवश्यक असते.
स्तनपान हे आई व बाळाचे संबंध दृढ होण्यासाठी अत्यावश्यक असतेच, पण स्तन्य निरोगी व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आईचा प्रेमभाव, वात्सल्यभाव फार महत्त्वाचा असतो. लहान वयातच नाही, तर मोठेपणीही मनाला शांत करण्यासाठी शवय प्रेम भावनेत असते. मनाचा गोंधळ उडणे, नेमका निर्णय घेणे अवघड जाणे, असुरक्षितता, न्यूनगंड वगैरे त्रासाच्या पाठीमागे प्रेमाचे ऊब न मिळणे हे कारण असू शकते.
हाच नियम देशासाठीही लागू पडतो. देशातील जनतेला सत्ताधारी राजकारण्यांकडून जनतेच्या हिताच्या गोष्टीची अपेक्षा असते, पण सध्याचे राजकारणी खास करुन सत्ताधारी लोक, लोकांकडून सत्तेत येण्यासाठी मतांची अपेक्षा करतात, मात्र त्याच वेळेला निवडून आल्यावर ते आपापल्या धनिक मित्रांना भेटायला जातात, व धनिकांच्याच फायद्यांची कामे करतात. अशावेळी ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांची भीती वाटायला लागते, कारण ही नेते मंडळी केव्हा कसला निर्णय घेतील आणि देशातील गोरगरीब जनतेवर तो थोपवून जगणे मुश्किल करतील याचा नेम नाही.
सध्याच्या भाजप सरकारने २०१४ साली महागाई व बेरोजगारीच्या मुद्यावर जनतेला आश्वासित केले होते की, ‘अच्छे दिन आयेंगे', ‘बेकारी खतम हो जाएगी', ‘सबका विकास किया जायेगा' पण प्रत्यक्षात काय घडले व घडत आहे? ४०० रुपयाचे गॅस सिलिंडर ११५० रुपयावर नेले, बेकारी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. सरकारने नवीन रोजगार उपलब्ध केले नाहीतच, पण, असे काही नवनवीन कायदे करुन जे छोटे-मोठे कारखाने चालू होते ते बंद पडत गेले व असलेल्याचे रोजगार गेले. नोटबंदीने सर्वाचेच कंबरडे मोडले गेले आहे. त्यामुळे सध्या तरुण पिढीही भीतीच्या छायेत वावरत आहे.
महिलांच्या सक्षमीकरणाबाबत आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढावो'च्या बाबतीतही लोकांना खास करुन महिला वर्गालाही आता भीती वाटू लागली आहे. कोणत्या वेळी कोणते संकट ओढवेल याचा भरवसा नाही. रक्षकच भक्षक बनू पहात आहेत. त्यामुळे कोणाच्या भरोशावर जगायचे तेच कळेनासे झाले आहे.
सध्याचे केंद्र सरकार बे भरोशाचे झाले आहे. त्यांच्या जोडीला राज्य सरकारेही हतबल झाल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे, भीती मुवत जगणे कठीण झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात ‘डरो मत' पण प्रत्येकाची काही ना काही मजबूरी आहे, त्यांना घाबरुनच वागावे लागणार हे ओघाने आलेच. - भिमराव गांधले.