केकेव्ही आणि भूमिपुत्र

फणस हे फळ कोकणात पिकत असून सुद्धा ते आवडीने खाल्ले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. तळलेले गरे साधारण दोन महिने साठवता येतात. पण आजही पिक्का किंवा कच्चा फणस कोकणात विशेष आवडीने नाही खाल्ला जात. फणस दोन प्रकारचे असतात. एक बरका आणि दुसरा कापा. बरका फणसाचे सांदण, ढेबरं, घावण असे कांही कोकणी पारंपरिक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तरीही फणस कधी काळी गावांकडे भेट देण्याची वस्तू समजली जात असे. आंबा, काजू सारख फणस हे फळ पैसा देणारे नाही. म्हणून कोकणात फणस हे दुर्लाक्षित फळ आहे.

दापोलीच्या केकेव्ही विद्यापीठ कुलगुरूपदी कृषि क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधक आणि अस्सल कोकणस्थ डॉ. संजय दीनानाथ सावंत यांची नियुक्ती होणे ही अर्थातच तमाम कोकणवासीयांना ही आनंदाची बाब होती. अर्थातच डॉ. सावंत ह्यांचे द्राक्ष संशोधन क्षेत्रात भरीव काम आहे, हे गौरवास्पद आहे.

कांही वर्षांपूर्वीं ग्रामपंचायतच्या मध्यमातून कृषि उद्देशाने प्रगत असलेल्या दापोली तालुक्यातील पंचनदी हे गांव केकेव्हिने दत्तक घेतले होते. बरेचसे कृषि संलग्न असे प्रकल्प ज्याची प्रगत शेतकऱ्यांना माहिती अवगत व्हावी तसेंच ग्रामसभेत सर्व ग्रामस्थानी ह्याचा लाभ घ्यावा असं कृषि अधिकाऱ्यांना अभिप्रेत होते. अशाच माध्यमातून पंचनदीचे तत्कालिन सरपंच व उपसरपंच यांना विद्यापीठातर्फे सेमिनारमध्ये येण्यास टपालाने कळविले होते. त्या दोघांच्या आग्रहास्तव मला ही सेमिनारमध्यें भाग घेता आला. त्या सेमिनारमध्ये जॅक फ्रुट म्हणजेच फणस किंवा कटहल याविषयी बाहेर गावाहुन आलेले कृषी तज्ञ भाष्य करणार होते.  प्रथम विविध तज्ञांनी आपापले विचार मांडले. नंतर उपस्थित कोकणस्थ शेतकऱ्याचं अनुभव कथन झालं. फणस हे फळ बाहेरून काटेरी मात्र आंतून रसाळ गऱ्याची नैसर्गिक मांडणी केलेली दिसते. एका कृषितज्ञांनी कच्या फणसाची भाजी किंवा सरळ उकड तयार करून भाजी खाणाऱ्यांची संख्या जास्त नसेल. पण ते आपल्या स्पीचमध्यें कायम आग्रही होते. फणस हे पूर्णान्न आहे; म्हणून कोकणस्थ शेतकऱ्यांनी मोसमातील कच्चा फणस आवडीने खावा असं आग्रहाने सांगत होते. आघारी गांवचे सुपूत्र मोरे यांनी कच्चा फणस खायला नाहीं आवडत म्हणून स्पष्टीकरण दिले. एकूण चर्चा खूप रंगली. पण प्रत्यक्षात फणस हे फळ कोकणात पिकत असून सुद्धा ते आवडीने खाल्ले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. तळलेले गरे साधारण दोन महिने साठवता येतात. पण आजही पिक्का किंवा कच्चा फणस कोकणात विशेष आवडीने नाही खाल्ला जात. फणस दोन प्रकारचे असतात. एक बरका आणि दुसरा कापा. बरका फणसाचे सांदण, ढेबरं, घावण असे कांही कोकणी पारंपरिक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तरीही फणस कधी काळी गावांकडे भेट देण्याची वस्तू समजली जात असे. आंबा, काजू सारख फणस हे फळ पैसा देणारे नाही. म्हणून कोकणात फणस हे दुर्लाक्षित फळ आहे. पण ह्याचं खरं कारण आणि त्यावरील भाष्य तज्ञांनी केले नाहीं आणि आम्हीं शेतकरी त्याबद्दल विशेष बोलू शकलो नाही. कारण आम्हास कृषि विषयांतील पुस्तकी ज्ञान नव्हतेच आणि तशी कृषी विषयांतील पदवी नाही. अनुभवाने मात्र आम्ही शेतकरी.

नंतर केकेव्हीच्या शेतकरी मेळाव्यास आम्हीं टेटवली गावात हजर राहिल्याचे आठवते. यावेळी मात्र आम्हीं तिघेही गृहपाठ बऱ्या पैकी करून गेलो  होतो. आंबा बागायतदार आम्हीं विद्यापीठात जाऊन शेती शिकलो नाहीं. पण अनुभव असा की हापूस आंब्याची कलमवाडी असूनही सर्वच झाडांना मोहोर येत नाहीं. शिवाय एक ते दोन वर्षांच्या कालावधी नंतर मोहोर येतो. मधला दोन वर्षांचा कालावधी तोट्यातच जातो. मध्येंच वादळी वारा किंवा पाऊस पडल्यास मोहोर एकतर गळून जातो किंवा अति उन्हाळ्यात करपला जातो. एक ते दोन वर्षांचा असा  कालावधी मध्येच का येतो? फळधारणा न झालेलं हापूस कलमी झाड पुन्हां एकवर्षांने मोहोरेल याची शाश्वती आजवर कुणीच देऊ शकला नाहीं!  एक नांव अलीकडे खूपच व्हायरल होत आहे ते म्हणजे कलटार...रासायनिक संशोधनात कदाचित याला खूप मागणी असेल. पण सर्वसाधारण बागायतदार अशा घातक औषधाच्या आहारी नाहीं जात. दापोली/मंडणगड/खेड या भागातील हापूस आंबा मौसम एक में ते रोहिणी नक्षत्र येईपर्यँतचा कालावधी असतो. एकदा मान्सूनचा पहिला शिडकावा होतांच झाडावरील आंबे नासतात. दर एकदम कोसळतात आणि कोकणातला शेतकरी हतबल होऊन जातो. शेवटी निसर्गासमोर मान झुकतेच. आर्थिक ओझं वाढतं आणि म्हणूनच आजचा तरुण हा शहराकडे वळू लागला आहे. याला पर्याय काय असावा?

केकेव्हीला डॉ. सावंत साहेबांच्या रुपात एक आधुनिक शात्रज्ञ कुलगुरूपदी लाभले. आंबा/काजू/नारळ आणि सुपारी या पारंपारिक कोकणी पिकांना योग्य ती बाझारपेठ मिळवण्यात मार्गदर्शन करावे. सर भूमिपुत्र आहेत. त्यांनी संशोधन क्षेत्रात खूप काम केले आहे. आम्हांस त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

आंबा-काजूची सिझनला चोरी होत असते. गावातले कांही भटके टाईमपास म्हणून असले उद्योग कायम करत असतात. पोलिसांना चोरट्याची नावं पाहिजेत. तुमच्या बागांची रखवाली तुमची तुम्हीच करावी. आम्हाला इतर कामं बरीच असतात, असे खडखडीत बोल खाकी वर्दीकडून  ऐकावे लागतात. नारळ हे त्रैमासिक पीक असूनही त्यांस हमीभाव नाहीं. अशा अनेक खाचखळग्यातून आज कोकणी माणूस मार्ग काढत आहे.

शासन/केकेव्ही/बागायतदार अशी एक प्रातिनिधिक प्रत्यक्ष काम करणारी कमिटी अस्तित्वात आल्यास चार पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतील. तरुण माणूस गावातच स्थायिक होऊ शकेल. सर्वांनीच यावर विचार करावा. ही विनंती. -इवबाल शर्फ मुकादम...बु क वा ला, तळोजे. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

यंदाही फटाक्यांनी केली हानीच हानी !