झगमग दिवाळीतील नाते शोधतांना!

.....रात्रीच्या अंधारात अति उंचावर चांदण्यासी भेटण्या अनंत फटाके फुटत आहेत!महा कानठळ्या बसत असूनही,अजूनही बहिरेपनाचं सर्टाफिकेट मिळाल नाही!फटाके फोडून दिपावली साजरा होत आहे!काही दिवसांनी डॉक्टरांचा धंदा जोरात चालणार आहे!आम्ही मात्र फटाक्यांचा आनंद घेतं आहोत! दिपावली जोरात साजरी झाली पाहिजे! त्यासाठी काय पण झालं तरी चालेल! दिवाळी अनंत दिव्यातून उजळणारी नाही तर कर्कश फटाक्यांच्या दारुतून, धूर सोडणाऱ्या अन डोळे दिपवणाऱ्या फटाक्यातून साजरी होत आहे! म्हणायला मोकळे, आम्ही आमची दिवाळी साजरी करतोयं! तुम्हाला काय तरासं? अशा दिपावलीतून आनंद मिळेल का?...

... सहज आठवण झाली म्हणून आज मनोमनी मामांच्या गावी जाऊन दिवाळी साजरी करतोय!बघा तर खरं!..दिपावली आनंदाचा सण आहे! हर्ष उल्हास देण्या घेण्याचा सण आहे! कुटुंबातील प्रत्येक सदस्य या दीपोत्सवांत समरसून जात असतो!एकजीव होऊन जात असतो!अंधाऱ्या रात्रीतं प्रकाश देणारा,उजेड देणारा हा सण जीवन उजळतं असतो!दिपावलीतं..श्रीमंत-गरीब दोन्हीही आपापल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करून दिवाळी साजरी करीत असतात!...आमचीही दिपावली यायची! चार दोन आनंदाचे क्षण मनसोक्त वाटून जायची! खाणारे तोंड दहा होती! कमविणारे दोन जन होते! तरीही आटा पिटा करून आई-वडील पैसे कमवायचे! दिवाळी सणाला पोटाला गोड-धोड खाऊ घालायचे! नवे कपडे घालायचो! टिकली किंवा लोंगी फटाके हमखास फोडायचो! पण पण तो आनंद मोजता येत नव्हता हो! दिवाळीत आम्ही सर्वात श्रीमंत असायचो! नवीन कपडे दीपावलीतंचं मिळायचे!वर्षातून एकादच मिळायचे! माझी आई किती किती राबायची म्हणून सांगू? तिच्या कष्टाचा थेंब आमच्या माथी ओततो आहे!??

मुलांनी ताठ मानेने जगावं असा आदर्श ठेवणारी आमची आई,गरीबी पांघरून जगलेली आहे! आपलं आयुष्य फक्त पती अन मुलांसाठीचं आहे असा पक्का समज असलेली, अन मनात बिंबवलेली आई! त्यासाठी काट्यावंरं चालणारी ठमायठ दुःखाला सामोरे जात उभी होती!डगमगली नाही! आम्ही मामांच्या गावाला होतो!आईला चार भाऊ आणि पाच बहिणीं होत्या!मावशी देखील सणासुदीला मामांच्या गावी माहेरी जायची!हा मोठा गोतावळा म्हणजे मामांच्या गावी ठम्हासाळ्यालाठ नंदनवन फुललेलं असायचं! कडाक्याची थंडी पडलेली असायची! मामा मामींची धावपळ चाललेली असायची! मामांची मुलं-मुली सुद्धा दिवाळीचा आनंद लुटत असायची!??

दिपावली येत राहिल्या! पुढील दीपावली आतुरतेने बोलवीत राहिली!सण येत राहिले!जात राहिले!काळ पुढे सरकत राहिला!ठम्हसाळेठ... छोटस टूमदार गाव!मामांच गाव!काळासोबत बदलत राहिलं!जमिनीतला ओलावा खोल जात राहिला!नात्यांची ओल भुभागावर यावी तशी फक्त कंठा खाली येऊन थांबली होती!आईचे आई-वडील अर्थात आजोबा-आजीनीं ओलावा जीवंत ठेवला होता!घरादरात नंदनवन फुलवलं होतं!आजोबा आजी काळासोबत वृद्धापकाळाने देवाघरीं गेली!हळूहळू आमचं आजोळ नावाचं नंदनवन ओस पडत गेलं!??

आम्ही म्हसाळे सोडून आमच्या गावी शिंदखेडा येथे गेलो! कधीतरी वेळ प्रसंगी मामांच्या गावाला जाण्याचा योग यायचां! मामा-मामी खूप जीव लावायचे! लाड करायचे! सर्व मामी आमची चेष्टा करून पळवत राहायच्या! दिपावलीतं मात्र कधी राहण्याचा योग आला नाही! सर्व मामांची शेती गावाच्या चौफेर होती! अजूनही मामे भावांची शेती आहे! काळ सरकत राहतो! दिवस उगवतो तसा मावळतो देखील! जुनी घर जीर्ण होऊन पडली!काही तशीच आहेत! नवीन घर सिमेंटचं अस्तर लावून उभी राहू लागली आहेत! मातीची घर शांत शीतल होती! मया आणि माया लावणारी होती! आता सिमेंटची घर उभी आहेत!आतून प्रेम नसल्यासारखी उभी आहेत!शांत शीतल वडाचीं झाडं पर्ण झडल्यागत उभी दिसतात!कदाचित तीही कोलंमडलेली दिसतात!??

ज्या मातीत रक्ताचं नातं जन्माला आलं होतं!ज्या म्हसाळे गावाने भावा बहिणींना गोडव्याच्या नात्यात बांधलं होत!आमच्या आई सहीत नऊ बहीण भावंड जन्मली होती!म्हसाळे नावाचं सुंदर नंदनवन फुलले होते!शेतीवर अवलंबून असणार शेती प्रधान अन सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारं गाव होत!तेथे आमचे सर्व मामा देखील केंद्रबिंदू असायचे!सर्व बहिणींवर अतोनात जीव लावायचे! सर्व मामा सुख-दुःख प्रसंगी निरोप मिळाल्यावर धावत पळत यायचे!??

काळ वृद्धत्वाला हरवीत आपलं दणकट चाक पुढे रेटतो आहे!जीर्ण वडाची झाडं हळूहळू कोलमडू लागली आहेत!घट्ट नात्यांची माणसं काळाच्या पडद्या आड जात आहेत!दिवाळी आता ही प्रकाशित होतं असते!दिवाळी उजेडाची,ज्ञान उजेडाची जननी म्हणूयांतं!आमचे आवडते, लाडके,ज्ञानी मामा काळानुरूप,देवा घरी निघून गेलेतं!मामांचं गाव भरलेलं वाटतं पण ओलावा नसलेलं जाणवू लागलं आहे!??

आमचा जन्म देखील मामांच्या गावी झालेला! पूर्वी लोहचुंबकाने ओढून घ्यावे तसें आम्ही ओढले जायचो! आज आईच माहेर आहे पण माहेरपण दूरावतं चाललं आहे! म्हसाळे आमच्या मामांचं गाव आहे पण आजोबा-आजी, मामा-मामी एक एक करीत देवाला प्रिय होत असतांना गावाच्या मातीतंला ओलावा राहिलेला दिसत नाही! स्वप्नाळू दिवाळी मनी बांधत दिवाळी साजरी करीत राहायचं!जन्माच्या मातीपासून हळूहळू दुरावात चाललो आहोत!कोरडा प्रेमभाव कुठवर तग धरून ठेवणार आहे!या मातीत जावस वाटतं!पण आपली गासोडी कुणाकडे ठेवणार आहोत!माझ्या आईची!माझ्या शंभर वर्ष वय असलेल्या आईचे आई-वडील गेलेत!चारही भाऊ गेलेत!बहीण देखील आता एकटीच आहे!मन कुणाकडे ओढ घ्ोईल सांगा बरं???

या वर्षाची दिवाळी घरोघरी साजरी होत आहे! आनंद घेऊन आली आहे! विविध रंगीं बेरंगी फटाके फुटतांना दिसत आहेत!काल वसुबारस पासून दिवाळी प्रकाशित झालेली आहे!सिमेंटच्या घरातील आकसलेल्या नात्यातून आनंदोत्सव साजरा होत आहे!बाजारातून विकत आणलेल्या फटाक्यासारखे नाते जपत दिवाळी जोशात साजरी होत आहे! माझी शंभर वर्षांची आई देखील बोलत आहे,  दिवाळी माहेरच्या नात्यांसारखी गोड राहिलेली नाही! आई-वडील अन भावांसारखा गोडवा तिच्यात नाही! बाहेर झगमगाट दिसतो! आत धुसफूस असते! कुटुंब आकसलेली एक दोन डोक्यांची!??

कर्ण कर्कश फटाके धूर सोडून प्रदूषण वाढवीत आहेतं!पैशांच्या ओघात दिवाळी प्रकाशित झालेली आहे!भावनिक नात्यात व्यापारी घुसला आहे!आताची दिवाळी चवीला गोड वाटते,पचायला जड वाटते आहे!बाजारू दिवाळी नातेसंबध हरवलेली बेगडी दिवाळी आनंद मात्र बेंबीच्या देठापासून देत आहे! सब कुछ कमर्सियल असल्यासारखं!?? -नानाभाऊ माळी, पुणे. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 केकेव्ही आणि भूमिपुत्र